शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

ऑनलाईन रक्कम लंपास करणाऱ्या ठगबाजाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:54 AM

डेबिट, क्रेडिट कार्ड रिन्यूव्हल करण्याच्या नावाखाली कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन अनेकांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या झारखंडमधील ठगजबाजाचा शोध लावण्यात अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले.

ठळक मुद्देकोलकाता येथील साथीदार गजाआड झारखंडमधील सूत्रधार फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेबिट, क्रेडिट कार्ड रिन्यूव्हल करण्याच्या नावाखाली कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन अनेकांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या झारखंडमधील ठगजबाजाचा शोध लावण्यात अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले. या ठगबाजाकडून कमिशन घेऊन त्याला आपल्या नातेवाईकांचे बँक खाते उपलब्ध करून देणारे आरोपी प्रदीपकुमार मंडल (वय २२) आणि महावीर मंडल (वय २३) या दोघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य सूत्रधार टाटानगर (झारखंड) येथे दडून बसला असून, त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस पथक लवकरच तिकडे रवाना होणार आहे.बँकेचा अधिकारी बोलतो, असे सांगून ‘तुमचे डेबिट, क्रेडिट कार्ड जुने झाले. ते रिन्यूव्हल करायचे आहे,तातडीने माहिती सांगा अन्यथा तुमचे कार्ड ब्लॉक करण्यात येईल, अशी धमकी दिली जाते. कार्ड ब्लॉक झाल्यास आर्थिक व्यवहारात अडचण येईल, असा विचार करून घाईगडबडीत फोन उचलणारी व्यक्ती आपली माहिती पलिकडून बोलणाऱ्या कथित बँक अधिकाऱ्याला देते. ही माहिती दिल्याच्या काही क्षणानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज येतो. तेव्हा कुठे आपण फसवलो गेलो, याची कल्पना संबंधित व्यक्तीला येते.अशा प्रकारे फोन करून फसवणूक करणाऱ्या ठगबाजाची टोळी दिल्ली, नोएडा, झारखंडसह विविध राज्यात सक्रिय आहे. ४ डिसेंबरला भारतीय वनसेवेचे अधिकारी डॉ. श्रवण श्रीवास्तव यांनाही असाच फोन आला होता. श्रीवास्तव यांनी ठगबाजाला डेबिट कार्डची माहिती दिल्याच्या काही वेळेनंतर त्यांच्या खात्यातून दीड लाखांची रक्कम काढल्याचा मेसेज आला होता. त्यामुळे डॉ. श्रीवास्तव यांनी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.ठाणेदार भीमराव खंदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या बँक खात्यातून ही रक्कम काढली ते बँक खाते कोलकाता जवळच्या आसनसोल येथील एका व्यक्तीचे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्यामुळे अंबाझरीच्या पोलीस पथकाने कोलकाता येथे जाऊन संबंधित खातेधारकाची चौकशी केली. सदर खातेधारकांनी प्रदीपकुमार आणि महावीर मंडलची नावे सांगितली. ते आसनसोल येथे असल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यामुळे रविवारी पोलिसांनी या दोघांना अटक केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम