पिस्तुलाच्याधाकावर लुटमार
By Admin | Updated: July 1, 2015 02:52 IST2015-07-01T02:52:40+5:302015-07-01T02:52:40+5:30
पिस्तुलाच्या धाकावर ज्येष्ठ नागरिकांच्या घरात लुटमार करणाऱ्या आरोपींना अवघ्या तीन तासात मुद्देमालासह ताब्यात घेण्याची प्रशंसनीय कामगिरी लकडगंज पोलिसांनी बजावली आहे.

पिस्तुलाच्याधाकावर लुटमार
अवघ्या तीन तासात छडा : आरोपी मुद्देमालासह ताब्यात
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर ज्येष्ठ नागरिकांच्या घरात लुटमार करणाऱ्या आरोपींना अवघ्या तीन तासात मुद्देमालासह ताब्यात घेण्याची प्रशंसनीय कामगिरी लकडगंज पोलिसांनी बजावली आहे. प्रेम रमेश बोंद्रे (वय १८), मयूर सुधाकर चिमोटे (वय १८, रा. गणेश एज्युकेशन सोसायटी, विवेकानंदनगर), अभिजित बलवंत राघोटे (वय १९, रा. चिंचभवन) अशी या लुटमारीतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार (चौथा आरोपी) १७ वर्षाचा आहे.
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंतामणी अपार्टमेंट, सोमलवाडा येथे शरद जयरामजी गुप्ता (वय ६८) राहतात. मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता त्यांच्या घराची बेल वाजली. दार उघडताच चार तरुण घरात शिरले.
त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून रोख ४ हजार आणि ७ ग्राम सोन्याची साखळी हिसकावून नेली. घरात वृद्ध गुप्ता यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा होता. मात्र, त्यांनी पिस्तुल पाहून प्रतिकार करण्याचे टाळले. आरोपी पळून जाताना त्यांनी त्यांच्या दुचाकीचा क्रमांक लिहून लगेच सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून मालकाचा पत्ता मिळवला. ते लकडगंजमध्ये राहात असल्याचे कळताच लकडगंज पोलिसांना कळविण्यात आले.(प्रतिनिधी)