सडकछाप मजनूचा चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST2021-04-26T04:08:30+5:302021-04-26T04:08:30+5:30
फिर्यादी राजवर्धन वंजारी (वय २९) हे पाचपावलीत राहतात. ते किंवा घरचे ईतर पुरुष घरात नसल्याचे लक्षात आल्यास आरोपी गोरे ...

सडकछाप मजनूचा चाकूहल्ला
फिर्यादी राजवर्धन वंजारी (वय २९) हे पाचपावलीत राहतात. ते किंवा घरचे ईतर पुरुष घरात नसल्याचे लक्षात आल्यास आरोपी गोरे हा घरात डोकावून महिलांना बघत होता. ते लक्षात आल्याने त्याला वंजारी यांनी हटकलेही होते. शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास वंजारी, त्यांची बहीण तिच्या प्रज्वल आणि हनी चायंदे नामक मुलांसह जरीपटक्यातील पाटनकर चाैकातून विक्तूबाबा नगरकडे जात होती. त्यांना आरोपी अविनाश गोरे त्याच्या पाच साथीदारांसह दिसला. त्यामुळे वंजारी आणि त्याचे दोन्ही भाचे त्याला पकडण्यासाठी धावले. यावेळी आरोपी गोरेने हनी चायंदेवर चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी गोरेविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---