विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क रस्ता वाहतुकीसाठी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST2021-09-24T04:10:29+5:302021-09-24T04:10:29+5:30

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ इमारत ते जुने मॉरिस कॉलेजजवळील झिरो माईल फ्रीडम पार्कपर्यंतच्या रोडचे गुरुवारी महापौर ...

Road traffic from University to Zero Mile Freedom Park continues | विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क रस्ता वाहतुकीसाठी सुरू

विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क रस्ता वाहतुकीसाठी सुरू

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ इमारत ते जुने मॉरिस कॉलेजजवळील झिरो माईल फ्रीडम पार्कपर्यंतच्या रोडचे गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी, कुलगुरू सुभाष चौधरी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते संयुक्तरीत्या लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, प्र-कुलगुरू संजय दुधे, नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित होते.

Web Title: Road traffic from University to Zero Mile Freedom Park continues