रस्त्यावर टोमॅटोचा सडा

By Admin | Updated: November 16, 2016 02:54 IST2016-11-16T02:54:25+5:302016-11-16T02:54:25+5:30

गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने टोमॅटो घेऊन येत असलेल्या भरधाव मालवाहू बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने उलटली.

Road tomatoes on the road | रस्त्यावर टोमॅटोचा सडा

रस्त्यावर टोमॅटोचा सडा

भरधाव बोलेरो उलटली : चालक, क्लिनर किरकोळ जखमी
भिवापूर : गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने टोमॅटो घेऊन येत असलेल्या भरधाव मालवाहू बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. त्यात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून रोडवर टोमॅटोचा सडा पडला होता. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-गडचिरोली मार्गावरील मरू नदीच्या पुलाजवळ मंगळवारी दुपारी घडली.
एमएच-४९/डी-३१५४ क्रमांकाची मालवाहू बोलेरो टमाटर घेऊन गडचिरोलीहून भिवापूरमार्गे नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. ही बोलेरा भिवापूरनजीकच्या मरू नदीच्या पुलाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बोलेरो रोडच्या मध्यभागी उलटली. त्यामुळे बोलेरोतील टोमॅटो रोडवर पसरले, शिवाय या मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. नागरिकांनी रोडवरील टोमॅटो पायदळी तुडविल्याने रोडवर चिखल तयार झाला होता.
माहिती मिळताच भिवापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या वाहनचालक व क्लिनरला उपचारासाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले, तसेच रोडवरील बोलेरो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. (तालुका प्रतिनिधी)

नागरिकांचा टोमॅटोवर डल्ला
नागपूर-गडचिरोली मार्ग वर्दळीचा आहे. शिवाय घटनास्थळ हे भिवापूरपासून एक कि.मी. अंतरावर असल्याने अपघातग्रस्त वाहन टोमॅटोचे असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले. त्यांना वाहनात व रोडवर टोमॅटो पडले असल्याचे दिसताच अनेकांनी टोमॅटो उचलून घरी नेले. काही टोमॅटो पायदळी तुडविले गेल्याने रोडवर ‘लाल चिखल’ तयार झाला होता.

Web Title: Road tomatoes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.