लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी ते खडगाव मार्ग सध्या आहे. अक्षरशः चाळण झाला आहे. प्रचंड वाहतूक, ट्रकच्या रांगा आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहनचालकांचे कंबरडेच मोडू लागले दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. अनेक वर्षांपासून मार्गाचे डांबरीकरण योग्य दर्जाचे न झाल्याने आणि सिमेंटीकरण अधुरे राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
अमरावती रोडवरील वाडीपासून सोनबानगरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट रस्ता बांधला असला, तरी खडगावपर्यंत सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. सोनबानगरच्या पुढे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कुठे एकेरी, कुठे दुहेरी रस्ता, कुठे रस्त्याची रुंदीच कमी.
या साऱ्या अकार्यक्षम नियोजनामुळे वाहतूक कोंडी नेहमीची बाब बनली आहे. विशेषतः टेकडी-वाडी परिसरात समस्या अधिक तीव्र आहे. या सिमेंट रस्त्यावर पथदिवे सुद्धा बसवलेले नाहीत.
पावसाळ्यात अपघातांची शक्यता वाढलीखड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे हे समजणे अवघड झाले आहे. डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी मातीचा रस्ताच उरला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही डोळेझाक केली जात आहे.
कोण घेणार दखल ?लाव्हा व खडगांव ग्रामपंचायती या मार्गावर येतात. हजारो वाहनांचा या मार्गावरून रोज प्रवास होतो. तरीही लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अजूनही उपेक्षित आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी अथवा दर्जेदार डांबरीकरणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.