आझाद चौक ते भोला गणेश चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST2021-02-11T04:08:44+5:302021-02-11T04:08:44+5:30
नागपूर : महापालिका क्षेत्रातील आझाद चौक, लाकडी पूल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी ...

आझाद चौक ते भोला गणेश चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद
नागपूर : महापालिका क्षेत्रातील आझाद चौक, लाकडी पूल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारीपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचे प्रस्तावित केले आहे. वाहतुकीस होणाऱ्या अडचणीमुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्र १० मधील रस्ता आझाद चौक, लाकडी पूल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारीपर्यंतचा रस्त्या सिमेंट काँक्रिट करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने आझाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते भोला गणेश चौकापर्यंतची रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. सदर रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असून, पर्यायी मार्ग सुरू होतो त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहेत. जनतेने वाहतूक नियमाचे पालन करण्याच्या सूचना आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.
------------
राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या नोंदणी अर्जास
२८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नागपूर : राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारण्याचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत होता. त्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरून २ मार्चपर्यंत मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे आवश्यक आहे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे ५ मार्चपर्यंत जमा करावी, असे राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
-------------