नागपुरात रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:06 IST2020-01-01T22:58:54+5:302020-01-01T23:06:53+5:30
महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

नागपुरात रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त कारवाई सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. महाल परिसरात ५० ते ६० लोकांच्या जमावाने पथकाची कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काहीवेळ तणावही निर्माण झाला होता. परंतु विरोधाला न जुमानता या परिसरातील अतिक्र मण हटविण्यात आले.
महाल येथील महापालिका कार्यालयाच्या परिसरात तसेच कल्याणेश्वर मंदिर परिसरात रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविताना ६० ते ७० विक्रेत्यांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्यात आले. नरसिंग टॉकीज ते घाटे दुग्ध मंदिर ते कोतवाली चौक, कल्याणेश्वर मंदिर ते झेंडा चौक, झेंडा चौक ते लाकडी पूल, पुढे बडकस चौक यादरम्यानचे ७५ अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच मंगळवारी झोनच्या पथकाने अवस्थीनगर येथील फूटपाथवर लावण्यात आलेली दुकाने हटविली.
धरमपेठ झोन
धरमपेठ झोन क्षेत्रातील लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौकदरम्यानच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण हटविले. तसेच गोकुळपेठ मार्केट परिसरातील फूटपावरील अतिक्रमणाचा सफाया क रण्यात आला.
सतरंजीपुरा झोन
सतरंजीपुरा झोनच्या पथकाने दहीबाजार पूल ते मच्छी बाजार पूल पुढे कावरापेठ ते इतवारी रेल्वे क्रॉसिंग या दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथ मोकळे करण्यात आले. विक्रे त्यांचे एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
लकडगंज झोन
प्रवर्तन विभागाच्या पथकाने लकडगंज झोन क्षेत्रातील छाप्रूनगर चौक ते वर्धमाननगर चौक ते वैष्णवदेवी चौक ते प्रजापतीनगर चौक पुढे जुना पारडी नाका ते सुभाननगर चौक ते जय जलाराम गेटपर्यंतच्या फूटपाथवरील ३५ अतिक्रमण हटविले. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले.
हनुमाननगर झोन
अतिक्रमण विरोधी पथकाने हनुमान नगर झोन क्षेत्रातील तुकडोजी पुतळा चौक ते सिद्धेश्वर हॉल ते मानेवाडा चौक या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवरील २३ अतिक्रमण हटविले.
पाच सहायक आयुक्त सहभागी
या कारवाईत प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, हरीश राऊ त, प्रवर्तन विभागाचे निरीक्षक संजय कांबळे, आदींच्या नेतृत्वात विविध झोन क्षेत्रात राबविण्यात आली. कारवाईत प्रवर्तन विभागातील शादाब खान, विशाल ढोले, आतीश वासनिक, माळवे यांच्यासह उपद्रव शोध पथकाचे जवान सहभागी झाले होते.
महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई
शहरातील नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता व समितीच्या अहवालानुसार महापौर संदीप जोशी व आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला १ जानेवारीपासून शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रवर्तन विभागासह झोनच्या सहायक आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचा कारवाईला सुरुवात केली. अतिक्रमण हटवून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.