नागपुरातील अर्धवट व सदोष सिमेंट रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:57 PM2019-11-06T23:57:56+5:302019-11-06T23:59:11+5:30

शहरातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ठप्प आहेत. तर जी सुरू आहेत ती संथ आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट व सदोष आहेत.

Risk of accident due to partial and defective cement roads in Nagpur | नागपुरातील अर्धवट व सदोष सिमेंट रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

नागपुरातील अर्धवट व सदोष सिमेंट रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी कामे ठप्प : पावसाळी नाली नसल्याने पावसाचे पाणी घरात : झाडांकडेही कंत्राटदारांचे दुर्लक्ष : वाहनाचालक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ठप्प आहेत. तर जी सुरू आहेत ती संथ आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट व सदोष आहेत. वर्षभरापूर्वीच्या रस्त्यांवर खड्डे पडत आहे. तर कुठे रस्ता समतल नाही. काही रस्त्यांचे काम करताना पावसाळी नालीचा विसर पडला आहे. रस्त्यालगतच्या झाडांनाही धोका निर्माण झाला. याकडे पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर शहरातील नागरिकांचा त्रास कमी झाला असता. कामही दर्जेदार झाले असते. नवीन महापौरांची लवकरच निवड होणार आहे. त्यापूर्वी महापौरनंदा जिचकार यांनी बुधवारी शहरातील सिमेंट रस्त्यांची पाहणी केली. यात लोकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आले.
महापौरांनी मंगळवारी व आसीनगर झोन अंतर्गत भागातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री अमीन अख्तर, रामचंद्र खोत, गिरीश वासनिक, मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, उपअभियंता दिलीप बिसेन, उपअभियंता सुनील उईके, कनिष्ठ अभियंता रवी मांगे यांच्यासह संबंधित सिमेंट रस्त्यांचे बांधकाम कार्य करणारे कंत्राटदार उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयासमोरील विधानभवन ते व्हीसीए मैदान, पोलीस लाईन टाकळी येथील तलावापुढील मार्ग, सादिकाबाद टी-पॉईंट ते दिनशॉ मार्ग, बोरगाव चौक, जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तान समोरील मार्ग, दयालू सोसायटी जरीपटका, बॉम्बे स्कूटर ते एकता पॅलेस मार्ग, टेका नाका नारा रोड यासह अन्य सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट व दोषपूर्ण असल्याचे दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आले.
महापालिका मुख्यालयासमोरील विधानभवन ते व्हीसीए, पोलीस तलावापुढील मार्ग, सादिकाबाद टी-पॉईंट ते दिनशॉ मार्ग, बोरगाव चौक, जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तान समोरील मार्ग, दयालू सोसायटी जरीपटका, बॉम्बे स्कूटर ते एकता पॅलेस मार्ग, टेका नाका नारा रोड आदी मार्गांच्या कामाची पाहणी केली.

Web Title: Risk of accident due to partial and defective cement roads in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.