शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कुख्यात हिरणवार टोळीचा हॉटेलमध्ये हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:17 IST

कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास बैठक रेस्टॉरेंटमध्ये ही घटना घडली.

ठळक मुद्देहॉटेलमालकावर प्राणघातक हल्ला : तोडफोड करून दहशत पसरवली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास बैठक रेस्टॉरेंटमध्ये ही घटना घडली.बंटी हिरणवार, साहिल शेंद्रे, करण शेंडे, शक्ती यादव, मोन्या आणि पवन हिरणवार अशी आरोपींची नावे असून ते सर्व चामडिया, काचीपुरा येथील रहिवासी आहे.अभिषेक राजेश पटेल (वय २४) हा बुधवारी रात्री ८ च्या सुमारास बजाजनगरातील बैठक रेस्टॉरेंटमध्ये बसून होता. तेवढ्यात तेथे आरोपी बंटी, पवन हिरणवार आपल्या टोळीतील गुंडांसोबत आला. ‘तू शत्रूसोबत जाऊन भेटला. आमच्याशी गद्दारी केली’, असे म्हणत हे गुंड पटेलसोबत वाद घालून त्याला शिवीगाळ करू लागले. हॉटेलमध्ये वाद होत असल्याचे पाहून हॉटेलमालक डोनॉल्ड बाबाराव ढोमणे मध्यस्थी करायला गेले. त्यांनी आरोपींची समजूत काढण्याचे प्रयत्न केले असता आरोपींनी त्यांना कशाला शहाणपण करतो, असे म्हणत खुर्ची टेबल, दगड, व हाथबुक्कीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हॉटेलमध्ये खुर्च्या, टेबल तसेच इतर साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण केली. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण घ्यायला आलेली मंडळी बाहेर पळून गेली. गंभीर जखमी झालेल्या ढोमणे यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पटेल याने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा