बलात्काऱ्याला जमावाने बदडले
By Admin | Updated: April 17, 2016 03:00 IST2016-04-17T03:00:04+5:302016-04-17T03:00:04+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला संतप्त जमावाने बदडले. जरीपटक्यात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

बलात्काऱ्याला जमावाने बदडले
नागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला संतप्त जमावाने बदडले. जरीपटक्यात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आकाश देवानंद टेणपे (वय २३) असे आरोपीचे नाव असून, तो कबिरनगरात राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जरीपटक्यात शुक्रवारी रात्री एका लग्नसमारंभात पीडित मुलगी (वय १४) आपल्या परिवारासह आली होती. समारंभ संपल्यामुळे पाहुण्यांची आवराआवर सुरू झाली. संबंधित परिवारही घराकडे जायच्या तयारीत होता. पीडित मुलगी दिसत नसल्याने तिच्या आईने नातेवाईक आणि इतरांना माहिती दिली. त्यानंतर मुलीची शोधाशोध सुरू झाली. रात्री ११.३० च्या सुमारास पीडित मुलगी बाजूच्या पडित घरातून रडत येताना दिसली. तिच्या पाठोपाठ आरोपी टेणपे येत होता. पीडित मुलीने पाहुण्यात येऊन त्याचे पाप उघड करताच जमावाने त्याला पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. पाणी आणून देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला मंडपाबाहेर नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. या घटनेमुळे लग्नसमारंभस्थळी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस पोहचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)