शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबुल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
3
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
4
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
5
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
6
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
7
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
8
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
9
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
10
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
11
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
12
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
13
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
14
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
15
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
16
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
17
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
18
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
19
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 15:15 IST

रविवारी रात्री शहरातील पंचशील या सिनेमागृहात कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना मध्येच गोंधळ घालून महिलांची छेड काढण्याची घटना घडली.

ठळक मुद्देसडकछाप मजनूंचा हैदोस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्री शहरातील पंचशील या सिनेमागृहात कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना मध्येच गोंधळ घालून महिलांची छेड काढण्याची घटना घडली. या छेड काढणाऱ्या सडकछाप मजनूंना सीताबर्डी पोलिसांनी कोठडीत टाकले.पंचशील सिनेमागृहात रविवारी कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना रात्री १०.४५ च्या सुमारास बाल्कनीत अचानक शुभम दयाशंकर केसवानी (वय २०, रा. चौधरी चौकाजवळ), मोहीत उर्फ मोनू ललीतकुमार पंजवानी (वय २१, रा. आहुजा नगर), हेमंत केशवदास ममतानी (वय ३०, रा. श्रीकलगीधर सत्संग जवळ), बिपीन जियालाल डेमला (वय २४, रा. हुडको कॉलनी) आणि पुनित नरेशकुमार माखिजा (वय २३) या आरोपींनी आरडाओरड करून गोंधळ सुरू केला. एवढ्यावरच ते थांबले नाही. आजुबाजूला बसलेल्या प्रेक्षकांच्या सीटवर चढून ते नाचू लागले. या प्रेक्षकांनी त्यावर हरकत घेतली असता ही मुले त्यांना मारहाण करू लागली. काही महिला-मुलींच्या चेहºयावर मोबाईलचे टॉार्च मारून त्यांची छेडही काढली. त्यामुळे चित्रपटगृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. अनेक महिला-मुलींनी चित्रपटगृहातून बाहेर धाव घेतली. आरोपींना काहींनी समजावण्याचे प्रयत्न केले असता ते मारहाण करू लागले. आरोपींनी दंगा सुरू केल्याची माहिती कळताच सीताबर्डीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी शुभम केसवानी, मोनू पंजवानी, हेमंत ममतानी, बिपीन डेमला आणि पुनित माखिजा यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले असतानाच संतप्त महिलांचा घोळका ठाण्यात पोहचला. आरोपींनी आपल्या आसनावर (सीटवर) चढून लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार ३५ वर्षीय महिलेने नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध सिनेमागृहात दंगा करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. उपरोक्त आरोपींना अटक करण्यात आली.आरोपींचे साथीदार फरारप्रत्यक्षदर्शी सूत्रांच्या माहितीनुसार, उपरोक्त आरोपींचे आणखी काही साथीदार या गुन्ह्यात सहभागी होते. ते महिला मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करीत होते. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी गर्दीत शिरून पलायन केल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग