शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या अधिकारांना कात्री, कार्यबाहुल्याच्या नावाखाली दिले सचिवांना अधिकार

By यदू जोशी | Updated: December 12, 2017 01:27 IST

सहकारी संस्थांसंदर्भातील प्रकरणांमध्ये निबंधकांनी दिलेल्या आदेशांच्या अपिलावरील सुनावणी करण्याचे अधिकार सहकार मंत्र्यांऐवजी आता विभागाच्या सचिवांना असतील. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर : सहकारी संस्थांसंदर्भातील प्रकरणांमध्ये निबंधकांनी दिलेल्या आदेशांच्या अपिलावरील सुनावणी करण्याचे अधिकार सहकार मंत्र्यांऐवजी आता विभागाच्या सचिवांना असतील. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यातील हजारो सहकारी संस्थांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी सहकार निबंधकांकडे होते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५२ मधील तरतुदीनुसार सहकार निबंधकांनी दिलेल्या सुनावणीवर राज्य शासनाकडे अपील करता येते. कायद्याच्या व्याख्येत शासन म्हणजे मंत्री असे गृहित धरून अपिलावरील सुनावणीचे अधिकार मंत्र्यांना दिले जातात. याआधी मंत्र्यांनी केलेल्या सुनावण्या बरेचदा वादग्रस्तदेखील ठरलेल्या आहेत. तथापि, आता सहकार मंत्र्यांकडील सुनावणीचे अधिकार सचिवांकडे देत देवेंद्र फडणवीस सरकारने पारदर्शकतेचा परिचय दिला आहे. विशेष म्हणजे स्वत: सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही सुनावणीच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा आग्रह धरला होता, असे सूत्रांनी सांगितले.अनेक प्रकरणांमध्ये अपिलात आलेल्या संस्थांची व त्या विरुद्धची बाजू समजून घेण्यासाठी मंत्र्यांना बराच वेळ द्यावा लागतो. अनेक महत्त्वाच्या बैठकी, लोकप्रतिनिधी व अभ्यागतांना भेटीसाठी वेळ देणे, वेळोवेळचे दौरे यातून असलेल्या कार्यबाहुल्यामुळे मंत्र्यांकडील अधिकार सचिवांना देण्यात येत असल्याचे समर्थन मंत्रिमंडळाच्या निर्णयात करण्यात आले आहे.राजकीय आकस हद्दपार!बरेचदा विशिष्ट राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकारी संस्थेबाबत मंत्र्यांकडे सुनावणीचे काम असेल आणि मंत्री अन्य राजकीय पक्षाचे असतील तर ते सुनावणीबाबत पूर्वग्रहदूषित आहेत, असा आरोप होऊ शकतो. आता मंत्र्यांकडील सुनावणी सचिवांकडे गेल्याने राजकीय आकसाचे आरोपही हद्दपार होणार आहेत.महसूलमंत्री कित्ता गिरवणार का?जमीन मालकीहक्क, वारसाहक्क आदींसंदर्भात अपिलावरील सुनावण्या उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त (महसूल) आणि मंत्री या क्रमाने होतात. मंत्र्यांकडील सुनावण्या हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे सहकार विभागाचा कित्ता गिरवत आपल्याकडील सुनावणीचे अधिकार महसूल सचिवांना देतील का, याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयministerमंत्री