शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापनांना शिक्षक निवडीचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:13 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाने शिक्षक निवड व नियुक्तीसंदर्भातील एका अध्यादेशाला अवैध घोषित करत एक मोठा दणका दिला आहे. शाळा व्यवस्थापनांना शिक्षक निवड व नियुक्तीचा अधिकार आहे. शाळांनी ‘पवित्र’च्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांचीच निवड करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या अध्यादेशाला आव्हान देत स्त्री शिक्षण प्रचारक मंडळ व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. यावर न्या. रवी देशपांडे व न्या. विजय जोशी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्वाळा : राज्य शासनाला दणका

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाने शिक्षक निवड व नियुक्तीसंदर्भातील एका अध्यादेशाला अवैध घोषित करत एक मोठा दणका दिला आहे. शाळा व्यवस्थापनांना शिक्षक निवड व नियुक्तीचा अधिकार आहे. शाळांनी ‘पवित्र’च्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांचीच निवड करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या अध्यादेशाला आव्हान देत स्त्री शिक्षण प्रचारक मंडळ व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. यावर न्या. रवी देशपांडे व न्या. विजय जोशी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये केवळ पवित्र मार्फतच शिक्षक नियुक्ती करण्याबाबत राज्य सरकारने २२ जून २०१७ रोजी अध्यादेश जारी केला होता. यानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी पात्रता आणि अभियोग्यता परीक्षा बंधनकारक करण्यात आली.शिक्षक नियुक्तीतील भ्रष्टाचाराबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, असे आदेश दिले होते. त्या आदेशांच्या अनुषंगानेच राज्य सरकारने ‘पवित्र पोर्टल’मार्फत शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांची पात्रता व अभियोग्यता तपासणीसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यात गुणवंत ठरलेल्या उमेदवारांनाच शाळांनी नियुक्ती करावे, असा त्यामागील हेतू आहे, असा राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता बाळासाहेब आपटे यांनी युक्तिवाद केला.तर राज्य शासनाला केवळ शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व अर्हता निर्धारित करण्याचा अधिकार आहे. उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाला आहे. स्पर्धा परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवाराची गुणवत्ता जरी स्पष्ट होत असली तरीही त्याची योग्यता तपासली जाऊ शकत नाही. परीक्षेत उमेदवाराचे विषयांचे ज्ञान, अध्यापन कौशल्यही तपासले जात नाही, असा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड.भानुदास कुळकर्णी यांनी केला. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखलादेखील दिला.राज्य सरकार व याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका अंशत: मंजूर केली. ‘पवित्र पोर्टल’मार्फतच शिक्षक नियुक्ती करता येणार नाही, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. शाळा व्यवस्थापनाला मिळालेला शिक्षक नियुक्तीचा अधिकार अशाप्रकारे हिरावून घेता येणार नाही. त्यामुळे उमेदवार निवडण्याचा शाळा व्यवस्थापनाचा अधिकार अबाधित ठेऊन अभियोग्यता चाचणी कायम ठेवण्यात आली. त्या चाचणीतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना निवडण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.आर.एल. खापरे, अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, अ‍ॅड.राघव कविमंडन आदींनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक