रिक्षाचालकांचा नागपूरमध्ये मोर्चा
By Admin | Updated: December 12, 2015 00:36 IST2015-12-12T00:36:20+5:302015-12-12T00:36:20+5:30
रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला.

रिक्षाचालकांचा नागपूरमध्ये मोर्चा
पिंपरी : रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला.
मोर्चात पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, अध्यक्ष विलास भालेकर, विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशन अध्यक्ष विलास भालेकर, पँथर पॉवर रिक्षा संघटनेचे नेते नरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष भीमराव मोरे, रिक्षा बचाव आंदोलनाचे गणेश धमाले, बाबा सय्यद, धनंजय जगताप, पुणे संघटक बाळासाहेब शिंदे, आम आदमी रिक्षा
संघटनेचे समन्वयक अझगर बेग, कष्टकरी कामगार पंचायतीचे
प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, बळीराम काकडे, संभाजी गोरे, काळूराम वाघ आदी उपस्थित होते. या वेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ५ आमदारांसह मोर्चाच्या ठिकाणी येऊन रिक्षाचालकांच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी लावण्याचे आणि सभागृहात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना वुद्धापकाळात पेन्शन, आरोग्यविमा, भविष्यनिर्वाह निधी, इएसआय या सुविधा मिळाव्यात, भांडवलदार खाजगी कंपनीकडून रेडिओ कॅबच्या नावाखाली होणारे बेकायदेशीर वाहतूक बंद करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
बाबा कांबळे म्हणाले, ‘‘रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे निर्णय अनेक वेळा जाहीर करण्यात आले. परंतु, प्रत्यक्ष मात्र अंमल बजावणी झाली नाही. रिक्षाचालकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सरकारने आमच्याशी चर्चा करावी.’’ (प्रतिनिधी)