ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसमुळे शरीर होते प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:16+5:302020-12-27T04:07:16+5:30

* ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसवर उपचार आहे का? अजूनही यावर उपचार शोधण्यात वैज्ञानिक असमर्थ ठरले आहेत. सद्यस्थितीत हा आजार आणि त्याच्या ...

Rheumatoid arthritis affects the body | ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसमुळे शरीर होते प्रभावित

ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसमुळे शरीर होते प्रभावित

* ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसवर उपचार आहे का?

अजूनही यावर उपचार शोधण्यात वैज्ञानिक असमर्थ ठरले आहेत. सद्यस्थितीत हा आजार आणि त्याच्या लक्षणांवर काही अंशी नियंत्रण मिळवूनच उपचार केले जात आहेत. काही रुग्णांना या आजाराची बरेच काळपर्यंत जाणीवच होत नसल्याने, त्यांना हा आजार जडला आहे, याची माहितीच नसते. लवकरात लवकर निदान आणि प्रारंभिक उपचार हेच यावर सध्या तरी एकमेवर उपचार आहेत. यामुळे सांधेदुखीतील विकृतींना (डिफॉर्मिटिस) टाळता येते.

* प्रमुख लक्षणे कोणती?

हातापायाच्या लहान जॉईंट्स अकडले जातात. शिवाय, मनगट आणि गुडघ्यांमध्ये सूज येते. ही सुरुवातीची लक्षणे आहेत. साधारणत: ही लक्षणे सकाळी उठल्यानंतर दिसून येतात आणि रात्रीच्या वेळी वाढत असतात. थकव्यामुळे सुस्ती येणे आणि तापासारखी लक्षणेही सोबत असू शकतात. काही वर्षांनंतर सांध्यांमध्ये सूज येऊ शकते. जॉईंट्च्या मेम्ब्रेन जाड होणे आणि विकृती वाढणे, हेही लक्षणे आहेत. साधारणत: हा आजार अनुवांशिक आहे आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या आजाराच्या समस्या जास्त आहेत.

* कसे ओळखावे?

जॉईंट्समध्ये दुखण्याची लक्षणे आणि त्याचा प्रसार नेहमीच विशिष्ट पद्धतीने होतो. ईएसआर आणि सीआरपी सारख्या रक्ततपासणीने आजाराच्या गांभीर्याची जाणीव करवून देतात. ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसच्या रुग्णांच्या ब्लड सॅम्पल्समध्ये बहुतांशवेळी ऱ्युमेटॉईड फॅक्टर आणि सीसीपी ॲण्टीबॉडिजची उपलब्धता दिसून येते. काही रुग्णांमध्ये रोगाच्या निदानासाठी प्रभावित जॉईंट्सचे एक्सरे आणि एमआरआयसारख्या अतिरिक्त चाचण्या कराव्या लागतात. बरेचदा या आजाराची सुरुवात जॉईंट्समधून होते. संयुक्त फ्ल्युडच्या चाचणीने स्थिती आणखी स्पष्ट होते.

* काही लोकांमध्ये अगदी सामान्य तर काहींमध्ये जॉईंट्सच्या विकृती दिसायला लागतात

रोगाचे निदान लवकर झाले नाही किंवा उशिरा होण्याच्या स्थितीत आणि त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाल्याने जॉईंट्समध्ये विकृतीची शक्यता बळावते. वारंवार औषध बदलणे, ॲलोपॅथीकडून दुसऱ्या चिकित्सापद्धतीकडे जाणे किंवा उलटे उपचार, थांबून थांबून उपचार करणे ही जॉईंट्समध्ये विकृती वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. हर्बल, नॅचरोपॅथी, ॲक्युपंक्चरसारख्या अनेक चिकित्सा पद्धतीने बरेच काळपर्यंत लाभ मिळत नाही.

* आजारावरील पायाभूत उपचार कोणते?

हा एक दीर्घकालीन आजार आहे आणि जसजसा वेळ जातो तसतशी प्रकृती बिघडत असते. संयम, अनुशासन, कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक विचार लाभदायक ठरू शकतात. फिजिओथेरपीसह सामान्य व्यायामाने मांसपेशी कमकुवत होणे किंवा विकृतीची शक्यता कमी होते. एनएसएडीसह दु:खनिवारक औषधी लाभदायक ठरतात. स्टेरॉईडचा उपयोग करण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र, या सर्व औषधांचा दुष्परिणामही असतो. त्याचमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये. कॅल्शियम, व्हिटामीन डीचा अतिरिक्त वापर केला जाऊ शकतो.

* रोगाचा प्रसार थांबवण्यासाठीचे उपाय?

पेनकिलर्समुळे रोगाचा प्रसार थांबणार नाही. डीएमएआरडीमुळे रोगाचा वेग मंद पडतो. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, सल्फेसेलेजिन, मेथोट्रेक्सेट, लेफ्युनोमाईड सारख्या औषधे महत्त्वाची ठरतात. बायोलॉजिकल महाग असल्या तरी काही प्रकरणांत त्याचा लाभ होतो. मात्र, या सर्व औषधांचे दुष्परिणामही आहेत, हे लक्षात असू द्या.

* काळजी कशी घ्यावी?

न्यूमोनिया आणि स्वाईन फ्लूची लस घेणे गरजेचे आहे. हायपरटेंशन आणि हाय कोलेस्ट्रॉलच्या स्तराची चाचणी गरजेची आहे. धुम्रपान टाळावे.

* सर्जरी हा उपचार होऊ शकतो का?

काही रुग्णांना गुडघे किंवा कोपराच्या सर्जरीने लाभ होतो. सांधे आणि टेंडनमध्ये स्टेरॉईड, सांध्याच्या दुरुस्तीची सर्जरी, टेंडन ट्रान्सप्लांट, सिनोवेक्टॉमीसारखे काही प्रचलित उपचार आहेत.

* सांधे उत्तम आणि वेदनारहित ठेवण्याचे उपाय?

वेळेवर निदान, औषधांसोबतच फिजिओथेरपी आणि डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला लाभदायक ठरतो.

* हृदय आणि फुफ्फुसावरील परिणाम?

ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसच्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाचे रोग, प्रारंभिक अवस्थेतील ॲथेरोस्लेरोसिस आढळून येतात. कार्डियोवेस्कुलर डिसिज आणि हार्टअटॅक सामान्य आहेत. सांधेदुखीवरील उपचाराच्या वेळी कार्डिओवेस्कुलर आणि श्वसनयंत्रासंदर्भातील आजारांवरही लक्ष ठेवावे लागते.

ऱ्युमेटॉईड ऑर्थरायटिसवरील उपचाराच्या नव्या पद्धतींनी या दीर्घकालीन आजाराच्या रुग्णांमध्ये अपेक्षा वाढवल्या आहेत. फिजिओथेरपी, एक्सरसाईजवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

........

Web Title: Rheumatoid arthritis affects the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.