शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:56 IST

जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला.

ठळक मुद्देगावातील १८ दिव्यांग बांधवांना केले अर्थसाहाय्य : करवसुलीचा निर्धारित टप्पा गाठल्याने राबविला नाविन्यपूर्ण

उपक्रमचक्रधर गभणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेवढा पैसा आला तेवढा कमीच असतो. तो एखाद्या व्यक्तीकडे असो संस्था-कंपनीकडे असो किंवा एखाद्या कार्यालयाकडे असो. पैसे हातचे सुटत नाही, हा मनुष्यजातच स्वभाव आहे. त्यामुळे खिशातून एक रुपया काढून दुसऱ्याला देताना खूप विचार केला जातो. दुसरीकडे समाजशील असलेला मनुष्यच त्याला अपवाद ठरतो. हजारो-लाखोंमध्ये एखादा मनुष्य दुसऱ्याच्या आर्थिक मदतीसाठी हात पुढे करतो. सर्वच ग्रामपंचायतींचेही तसेच काहीसे समीकरण आहे. जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसाग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाची सर्व स्तरातून दखल घेण्यात आली. तब्बल १८ दिव्यांग बांधवांना मदत करून ग्रामपंचायतने इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला.रेवराल ग्रामपंचायतने यावर्षी करवसुलीचे निर्धारित लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ९१ टक्क्यांपर्यंत करवसुली करण्यात ग्रामपंचायतला यश आले. करवसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनीही हातभार लावल्यानेच ही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने करवसुलीतील तब्बल ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग-अंध बांधवांना अर्थसाहाय्य म्हणून देण्याचे ठरविले. दिव्यांग बांधवांना औषधोपचार वा इतर आर्थिक बाबीसाठी तो खर्च करता येईल, असा विचार प्रशासनाने केला. त्यानुसार ग्रामपंचायतने याबाबत सभा घेऊन प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने पारित केला.ठरल्यानुसार गावातील १८ गरीब, गरजू, दिव्यांग बांधवांची यादी तयार करण्यात आली. त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले. त्या सर्वांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले आणि सर्वांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाने दिव्यांग बांधवांनीही ग्रामपंचायतचे आभार मानले. या कार्यक्रमाला सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, ग्रामविकास अधिकारी सी. एस. बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील मस्के, रोशन मेश्राम, सुनीता गाढवे, अनिता मोहनकर, रेखा लोणकर, माला सोनेकर, छाया चुटे आदी उपस्थित होते.यांना केले अर्थसाहाय्यकरवसुलीतील ३ टक्के निधीतून एकूण १८ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये वॉर्ड क्र. १ मधील सुधाकर बिल्लारे, माया आस्वले, रामचंद्र वानखेडे, ईश्वर मेश्राम, बालचंद मस्के, पपिता राऊत, वॉर्ड क्र. २ मधील राहुल मदनकर, प्रभाकर मदनकर, वॉर्ड क्र. ३ मधील टेकचंद लोणकर, बलदेव श्रावणकर, जनार्दन सरोदे, मनोज नेवारे, वॉर्ड क्र. ४ मधील अमर सूर्यवंशी, शोभाराम मते, रामा हरकंडे, गौरव मुळे, आयुष पटले, सुखदेव खांडेकर यांचा समावेश आहे. छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर