विदर्भात जनजागृती करून क्रांतिज्योत यात्रेचा गुरुकुंजात समारोप
By Admin | Updated: September 2, 2014 01:07 IST2014-09-02T01:07:59+5:302014-09-02T01:07:59+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी संपूर्ण विदर्भात जनजागृती करून ३१ आॅगस्ट रोजी क्रांतीज्योत यात्रा गुरुकुंज मोझरीत परतली. ९ आॅगस्टपासून

विदर्भात जनजागृती करून क्रांतिज्योत यात्रेचा गुरुकुंजात समारोप
भरघोस प्रतिसाद : राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी
गुरूकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी संपूर्ण विदर्भात जनजागृती करून ३१ आॅगस्ट रोजी क्रांतीज्योत यात्रा गुरुकुंज मोझरीत परतली. ९ आॅगस्टपासून क्रांतीदिनाच्या पर्वावर राष्ट्रसंतांचे जन्मस्थान असलेल्या यावली येथून या यात्रेचा शुभारंभ झाला होता.
संपूर्ण विदर्भात ९० छोटी-मोठी शहरे व १ हजार गावांमध्ये या यात्रेने भ्रमण केले. अमरावती, नागपूर, अकोला, वाशिम, बुलडाणा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालय व प्रमुख ठिकाणी ही यात्रा नेण्यात आली.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात राष्ट्रसंतांचे मौलिक योगदान असतानाही त्यांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासन तयार नसल्याने समाजमनातील तीव्र संताप यात्रेदरम्यान दिसून आला. यात्रेच्या समारोपाप्रसंगी प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी रुपराव वाघ, हभप विलास साबळे, विदर्भ प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे, भीमराव कांडलकर, गव्हाळे महाराज उपस्थित होते. (वार्ताहर)