शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रादेशिक विकास मंडळांचे लवकरच पुनरुज्जीवन : डाॅ.भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 14:17 IST

दरडोई उत्पन्नाची तुलना करता महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा भारतीय जनता पक्ष तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अजेंड्यावर

नागपूर :

दरडोई उत्पन्नाची तुलना करता महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा भारतीय जनता पक्ष तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अजेंड्यावर असून विदर्भ, मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनाचा विषय लवकरच मार्गी लागेल. त्या दृष्टीने आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करीत असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे दिली. 

नागपूर दौऱ्यावर आलेल्या डॉ. कराड यांनी गुरुवारी सायंकाळी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. ख्यातनाम उद्योजक व आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अयोध्या रामी रेड्डी त्यांच्यासोबत होते. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी उभयतांचे स्वागत केले. यावेळी मनमोकळी चर्चा करताना डॉ. कराड म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेली प्रादेशिक विकास मंडळे पुन्हा कार्यरत व्हावीत. जेणेकरून जिल्ह्याजिल्ह्यांचे मागासलेपण मोजले जावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानाही तशी घोषणा केली आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली असून, लवकरच या मंडळांचे पुनरुज्जीवन होईल. 

दरडोई उत्पन्न कमी असलेल्या देशभरातील ११२ जिल्ह्यांना ॲस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट्स किंवा आकांक्षित जिल्ह्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील नंदुरबार, वाशिम, धाराशिव व गडचिरोली हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यांवर भाजपचे विशेष लक्ष असून, अशा जिल्ह्यांमध्ये उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. आपण स्वत: या महिन्यात नंदुरबारमध्ये यासंदर्भात बैठक घेत आहोत.मराठवाडा विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने विदर्भ, मराठवाड्याचे मागासलेपण आपण जवळून अनुभवले आहे. ते दूर करण्यासाठी चाकोरीबाहेरच्या काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्यानुसार, आपण स्वत: परिश्रम घेऊन छत्रपती संभाजीनगरजवळच्या विस्तीर्ण अशा नाथसागर धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यातून लवकरच १२०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होईल. हा किमान आशिया खंडातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट असेल.

ईशान्य भारताचा कायापालट झाला- पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात ईशान्य भारताचा अक्षरश: कायापालट झाला. २०१४च्या पूर्वीची ईशान्य भारतातील सात राज्यांची स्थिती व नंतरची स्थिती यातील फरक स्पष्टपणे जाणवतो. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांनी एक महिना यापैकी एका राज्याला द्यावा, असे पंतप्रधानांचे निर्देश आहेत. त्यानुसार आपल्याकडे आधी सिक्कीमची जबाबदारी होती, तर या महिन्यात अरुणाचल प्रदेशची जबाबदारी आहे. - तेथील विकास प्रक्रियेचा नुकताच आढावा घेतला असून, बँका व विमा कंपन्यांशी संबंधित बरीच कामे मार्गी लावली आहेत. याशिवाय, पक्षाने आपल्यावर गुजरातमधील जुनागड, पाटण व आणंद तसेच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली व धाराशिव या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी विश्वासाने सोपविली आहे. राज्यातील या जागा शिवसेना लढवायची. तेथे पुन्हा भाजप-शिवसेना युतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.