आजनी, गुमथळा सर्कलमधील समस्यांचा आढावा
By Admin | Updated: October 2, 2014 01:08 IST2014-10-02T01:08:20+5:302014-10-02T01:08:20+5:30
कामठी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी आजनी व गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधील गावांचा दौरा केला आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.

आजनी, गुमथळा सर्कलमधील समस्यांचा आढावा
कोराडी : कामठी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी आजनी व गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधील गावांचा दौरा केला आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.
बावनकुळे म्हणाले, गेल्या १० वर्षांत कामठी मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावण्यात आपल्याला यश आले. यातील काही महत्त्वाची कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. कामठी येथील कत्तलखाना गादा शिवारात स्थानांतरित करण्यात येणार असल्याचा प्रचार केला जात आहे. वास्तवात हा कत्तलखाना भांडेवाडी शिवारात स्थानांतरित केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील विविध ठिकाणचे पांदण रस्ते, ट्रान्सफॉर्मर यासह अन्य विकास कामांसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात अनिल निधान, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, दौलत मांडवकर, दिलीप सावरकर, मोबीन पटेल, बरिएमंचे गजभिये, शशिकांत गजभिये, माजी सभापती विमल साबळे, रामकृष्ण वंजारी, नाना आकरे, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र गवते, उन्मेष महल्ले, प्रभाकर देशमुख, किशोर राऊत, यदुनंदन बावनकुळे, ग्रामपंचायत सदस्य अरुण वाघधरे, मच्छिमार संघटनेचे रामभाऊ चौके, शेषराव वानखेडे, दिलीप मुळे, संपत पारेकर, देवा सावरकर, नरेंद्र धनोले, भय्या चमेले, सुरेश ढोक, खुशाल विघे, पांडुरंग आंबिलडुके, अविनाश हेडाऊ, संजय वाशीमकर, भास्कर चिंचूरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी होते. (प्रतिनिधी)