पंतप्रधानांच्या सभेच्या तयारीचा आढावा

By Admin | Updated: August 19, 2014 00:57 IST2014-08-19T00:57:57+5:302014-08-19T00:57:57+5:30

मौदा एनटीपीसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या तयारीचा आढावा सोमवारी कामठी-मौदा मतदारसंघाचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

Review of PM's meeting preparations | पंतप्रधानांच्या सभेच्या तयारीचा आढावा

पंतप्रधानांच्या सभेच्या तयारीचा आढावा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली एनटीपीसी परिसराची पाहणी
नागपूर : मौदा एनटीपीसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या तयारीचा आढावा सोमवारी कामठी-मौदा मतदारसंघाचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.
मौदा येथील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल उपस्थित राहतील. पंतप्रधानांच्या जाहीर सभेला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंग सुविधा, सुरक्षा व्यवस्था व सभेच्या व्यवस्थेचा आढावा यावेळी घेण्यात आला. हिंडाल्को कंपनीलगतचे मैदान, बाबदेव साखर कारखान्याचे मैदान येथे वाहन पार्किंग करण्यावर अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष सभा मंच तयार करण्यात येत असून, इतर प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
मौदा येथील कार्यक्रमासाठी येताना सुरक्षेच्या दृष्टीने बॅग, पिशवी, कॅमेरा, बॉटल आदी साहित्य आणू नये. पोलिसांनी यासंबंधी आवश्यक त्या सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले. यावेळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे डीआयजी एच. आर. श्रीवास्तव, अ‍ॅडिशनल डीआयजी मान, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक डॉ. सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, मंगेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, उपविभागीय अधिकारी (महसूल) चंद्रकांत बोरकर, तहसीलदार शिवराज पडोळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायगोले, महाव्यवस्थापक व्ही. थंगापांडियन, अप्पर महाव्यवस्थापक (मानव संसाधन) व्ही. शिवप्रसाद, व्यवस्थापक प्रशांत सिंह उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Review of PM's meeting preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.