पंचायत समितीत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:13+5:302021-01-17T04:09:13+5:30
सावनेर : पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. १६) आढावा बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात जल जीवन अभियान, घरकुल ...

पंचायत समितीत आढावा बैठक
सावनेर : पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. १६) आढावा बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात जल जीवन अभियान, घरकुल याेजना, स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा याचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) अनिल किटे, सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अनिल नागणे, विस्तार अधिकारी दीपक गरूड, फणीदार साबळी यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. अनिल किटे यांनी सावनेर तालुक्यात सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा याेजना, पिण्याच्या पाण्याची समस्या, जल जीवन अभियानांतर्गत केली जात असलेली कामे, घरकुल याेजनेची सुरू असलेली व रखडलेली कामे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेली व करावयाची कामे याचा आढावा घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या साेडविण्याबाबत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व गटसमन्वयकांना मार्गदर्शन केले.