शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खून का बदला खून ... नागपुरात पोलिसांमुळे टळला हत्येचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:48 IST

मित्राची हत्या करून कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला सदर पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली. यामुळे नागपुरातील हत्येची एक घटना टळली. पोलिसांनी पकडलेला आरोपी अक्षय किशोर बैसवारे ऊर्फ कनोजिया यानेच दस्तुरखुद्द ही माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे आरोपी पिस्तुलासह गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राची हत्या करून कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला सदर पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली. यामुळे नागपुरातील हत्येची एक घटना टळली. पोलिसांनी पकडलेला आरोपी अक्षय किशोर बैसवारे ऊर्फ कनोजिया यानेच दस्तुरखुद्द ही माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

आरोपी बैसवारे हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड डोमॅनिक आणि तुर्केलने त्याच्यावर २४ जुलैला घातक शस्त्रांनी हल्ला चढवला होता. त्यावेळी त्याच्या मदतीला कृष्णा राजू नायर नामक मित्र धावला. बैसवारेच्या अंगावरचे वार नायरने झेलल्यामुळे तो बचावला आणि नायरचा मृत्यू झाला. गिट्टीखदानमधील त्रिकोणी पार्कजवळ घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी डोमेनिक आणि तुर्केलला अटक केली. त्यांना कारागृहात डांबण्यात आले. २३ नोव्हेंबरला ते कारागृहातून जामिनावर बाहेर आले. त्यापूर्वीच बैसवारेने त्याच्या हत्येची तयारी करून ठेवली होती. त्याने एक पिस्तूल आणि काडतूसही घेऊन ठेवले होते.बैसवारेचा गेम बिघडलारविवारी रात्री डोमॅनिकचा गेम करण्याच्या इराद्याने बैसवारे घरून निघाला. रात्री मिळाला तर ठीक नाही तर सोमवारी दिवसभरात डोमॅनिकचा गेम करण्याचा त्याने निश्चय केला होता. दरम्यान, बैसवारे पिस्तूल घेऊन हत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सदर पोलिसांना मिळाली. त्यावरून सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौरसिया, सहायक उपनिरीक्षक गोमासे, हवालदार विनोद तिवारी, संदीप पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी मध्यरात्री बैसवारेला तीन मुंडी चौकाजवळ पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याने हे पिस्तूल डोमॅनिकच्या हत्येसाठी वापरणार होतो, अशी कबुली दिली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक