हरिहर मंदिरात प्रकटदिनोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:12+5:302021-03-07T04:09:12+5:30
नागपूर : लकडगंज येथील श्री हरिहर मंदिरात श्री गजानन महाराज प्रकटदिनोत्सव पार पडला. अत्यंत साधेपणाने पूजा विधान पार पडले. ...

हरिहर मंदिरात प्रकटदिनोत्सव
नागपूर : लकडगंज येथील श्री हरिहर मंदिरात श्री गजानन महाराज प्रकटदिनोत्सव पार पडला. अत्यंत साधेपणाने पूजा विधान पार पडले. मंडळ अध्यक्ष अर्जुनराव वैरागडे यांच्याहस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पुंडलिकराव बोलधन, राजू उमाटे, सचिव गुलाब बालकोटे, रामेश्वर हिरुळकर, भूषण क्षीरसागर, अंबादास गजापुरे, विजय क्षीरसागर, गोपाल कळमकर, रमेश नाकाड़े, कमलाकर घाटोळे, सुरेश बरबटे, सुरेश बारई, स्वप्निल वैरागड़े, रामदास गजापुरे, सुनील धावड़े, लक्ष्मणराव सातपुते, प्रकाश डांगे, उदय आकरे, व्यवस्थापक उमेश नंदनकर, देवेंद्र मिरानी, मुकेश, अरविंद झा, विजय झा उपस्थित होते.
------------
पोदार स्कूलमध्ये सायन्स एक्स्पो ()
नागपूर : पोदार वर्ल्ड स्कूल, कोराडी रोड येथे सायन्स एक्स्पो सायपोटेकचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या थिअरीवर प्रयोग सादर करण्यात आले. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला. यात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी लाय फाय युजेस, सोलर ड्रीप इरिगेशन, सोलर वॉटर हिटर, हायड्राॅलिक पंप, ब्रिज, वॉटर लेव्हल इंडिकेटर आदी विविध प्रयोग सादर केले.
यावेळी शाळेचे चेअरमन राघव पोदार, प्राचार्य भावना डोंगरदिवे यांनी मार्गदर्शन केले.
-------
श्री संत रविदास महाराज जयंती ()
नागपूर : नागसेननगर येथील श्री संत रविदास भवन येथे श्री संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक घातला गेला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मण सातनूरकर, युवराज इंगळे, उमेश थोटे, अनिल वासनकर, नरेंद्र इंगळे, आशू राजूरकर, माणिक इंगळे, बंडू राजूरकर, खुशाल घोरे, शशिकांत गुजरकर, सोमेश्वर इंगळे, मुकेश मालखेडे, नरेश इंगळे उपस्थित होते.
.........