शालेय सवंगड्यांचा स्नेहमीलन साेहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST2021-02-05T04:39:24+5:302021-02-05T04:39:24+5:30

हिंगणा : कान्हाेलीबारा (ता. हिंगणा) येथील श्रीकृष्ण विद्यालयात शिकलेल्या माजी विद्यार्थी व शालेय सवंगड्यांचा स्नेहमीलन साेहळा नुकताच कान्हाेलीबारा परिसरातील ...

Reunion of school peers | शालेय सवंगड्यांचा स्नेहमीलन साेहळा

शालेय सवंगड्यांचा स्नेहमीलन साेहळा

हिंगणा : कान्हाेलीबारा (ता. हिंगणा) येथील श्रीकृष्ण विद्यालयात शिकलेल्या माजी विद्यार्थी व शालेय सवंगड्यांचा स्नेहमीलन साेहळा नुकताच कान्हाेलीबारा परिसरातील शिवटेकडी येथे आयाेजित करण्यात आला हाेता.

या मेळाव्याचे आयाेजन श्रीकृष्ण विद्यालय व ग्रामविकास युवक संघटनाची मुहूर्तमेढ करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी केले हाेते. या मेळाव्यात सन १९८०च्या बॅचचे बहुतांश विद्यार्थी सहकुटुंब सहभागी झाले हाेते. अध्यक्षस्थानी दशरथ दुरुगवार हाेते. यावेळी संतोष येलुरे, शेषराव बुधबावरे, गजाननराव बानाबाकोडे, नरेंद्र कुकडे, संजय भांडेकर, सुरेश थोटे, अजित खॉ पठाण, भगवान गोल्हर, वसंतराव वैरागडे, अनिल गव्हाळे, अशोक आंबुलकर, अवधूत उडाण, लक्ष्मण दुधबडे यांच्यासह अन्य माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या अनमाेल आठवणींना उजाळा दिला. सर्वांनी सुरुवातीला वनग्राम चाैकीला भेट दिली. शिवाय, महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचेही आयाेजन केले हाेते. सर्वांनी वनभ्रमंती व निसर्गाचा आनंद लुटला. वनभोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रास्ताविक भगवान गोल्हर यांनी केले. संचालन सुरेश थोटे यांनी केले, तर नरेंद्र कुकडे यांनी आभार मानले.

Web Title: Reunion of school peers