शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठवणार : मनपा सभागृहात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 8:43 PM

महापालिकेत गरज नसतानाही शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेले अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठवून त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊ न भरा, तसेच महापालिकेत कार्यरत प्रतिनियुक्तीवरील दोन झोन सहायक आयुक्तांचा प्रशिक्षण कालावधी संपला असल्याने त्यांनाही परत पाठविण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत मंगळवारी घेण्यात आला.

ठळक मुद्दे रिक्त पदावर मनपाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत गरज नसतानाही शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेले अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठवून त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊ न भरा, तसेच महापालिकेत कार्यरत प्रतिनियुक्तीवरील दोन झोन सहायक आयुक्तांचा प्रशिक्षण कालावधी संपला असल्याने त्यांनाही परत पाठविण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत मंगळवारी घेण्यात आला.वित्त विभागात कार्यरत विलास कावळे यांच्यासह अन्य अधिकाºयांची पदे महापालिकेत मंजूर नसतानाही या विभागात कार्यरत आहेत. तसेच दोन झोनच्या सहायक आयुक्तांचा प्रशिक्षण कालावधी संपला असल्याने त्यांनाही परत पाठविण्याची मागणी माजी महापौर प्रवीण दटके यांनी केली. प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांमुळे महापालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा हक्क हिरावला जात आहे. राज्य शासनाने प्रशिक्षण संपलेल्या अधिकाऱ्यांचे वेतन देण्याला नकार दिला आहे. त्यांना महापालिकेने सेवेत कायम करून वेतन देण्याबाबतचे पत्र राज्य शासनाने पाठविल्याची माहिती दटके यांनी दिली. या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठवून त्यांची रिक्त होणारी पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, अशी मागणी केली. महापौर नंदा जिचकार यांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व प्रशिक्षणार्थी दोन सहायक आयुक्तांना शासनाकडे परत पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.ज्या पदासाठी सक्षम अधिकारी उपलब्ध नाहीत, अशा पदांची थेट भरती करण्यात यावी. त्यानुसार जाहीरात देऊ न भरती करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.रिक्त पदांमुळे करवसुली नाहीमहापालिकेच्या मालमत्ता विभागात ४९३ पदे मंजूर आहेत. यातील २७६ कार्यरत असून २१४ पदे रिक्त आहेत. याचा कर वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात अपेक्षित ५०९ कोटींचे उद्दिष्ट गाठणे शक्य नाही. याला मालमत्ता सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली सायबरटेक कंपनीही जबाबदार असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी उपस्थित केला. रिक्त पदावर भरती करण्याची मागणी केली. गत काळात ८०० ते १००० घरांसाठी एक कर्मचारी नियुक्त केला जात होता. आता १५ ते २० हजार घरांची जबाबदारी सांभाळावयाची असल्याचे सहारे यांनी निदर्शनास आणले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर