गुंतवणूकदारांना सात दिवसात ठेवी परत करा
By Admin | Updated: February 20, 2015 02:15 IST2015-02-20T02:15:47+5:302015-02-20T02:15:47+5:30
जोशी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असल्याने हा आदेश त्याला बजावण्याच्या संदर्भात सरकार पक्षाने एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता.

गुंतवणूकदारांना सात दिवसात ठेवी परत करा
जोशी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असल्याने हा आदेश त्याला बजावण्याच्या संदर्भात सरकार पक्षाने एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने आदेश बजावण्याची कामगिरी आर्थिक गुन्हे पथकाकडे सोपवली होती. सोमवारी तपास अधिकारी विष्णू भोये यांनी कारागृहात समीर जोशी याला हा आदेश दिला. न्यायालयात गुंतवणूकदारांचे वकील अॅड. बी. एम. करडे उपस्थित होते.
समीर जोशी याने ठेवी गोळा करून नये, गुंतवणूक संदर्भातील जाहिरातीचे साहित्य काढून घ्यावे, असेही या आदेशात नमूद आहे.
समीर जोशी बीएसई आणि एनएसईचा सब ब्रोकर होता. स्टॉक ब्रोकर मेसर्स किसन रतिलाल चोकसे शेअर्स अँड सेक्युरिटीज प्रा. लि. सोबतही संलग्न होता. त्याने १५ ते २८ महिन्यात दाम दुप्पटचे आमिष दाखवून ५००० कोटी रुपये ६००० गुंतवणूकदारांकडून गोळा केले. व्याज आणि मुद्दल गुंतवणूदारांना परत केले नाही, अशा तक्रारी सेबीला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सेबीने तपास केला होता.
सेबीच्या तपासात समीर जोशी याने श्रीसूर्या या नावाने सॉफ्ट ड्रिंक्स, इन्फ्रा प्रोजेक्ट, डेअरी अँड फार्म, कॅफे रिटेल, आॅईल अँड एक्सट्रॅक्शनस्, मीडिया नेटवर्क, इन टेक, वेल्थ रिस्क अॅडव्हाझरी, सुपर मार्केट आणि ड्रिम डेस्टिनेशनस्, अशा दहा कंपन्या सुरू केल्या होत्या. त्यापैकी इन टेक या कंपनीत समीर जोशी आणि मनोज तत्त्ववादी तर उर्वरित ९ कंपन्यांमध्ये समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी हे सर्वेसर्वा होते. श्रीसूर्याने ३१ मार्च २०१० पर्यंत ९३४ गुंतवणूकदारांकडून २१ कोटी ३० लाख, २०११ पर्यंत १७६२ गुंतवणूकदारांकडून ४२ कोटी २ लाख आणि २०१२ पर्यंत १९३० गुंतवणूकदारांकडून ५६ कोटी ७३ लाखांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.
समीर जोशी याला या आदेशावर २१ दिवसात आक्षेप दाखल करण्याची संधीही सेबीने दिली आहे. सेबीचे पूर्ण वेळ सदस्य राजीवकुमार अग्रवाल यांनी हा आदेश २० जानेवारी रोजीच जारी केला होता. हा आदेश सोमवारी बजावण्यात आला. (प्रतिनिधी)