शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! सेवेत नसलेल्या व्यक्तीच्या नावावर लाटले लाखोंचे सेवानिवृत्ती वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 21:08 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या सेवेत नसलेल्या व्यक्तीचे नाव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या यादीत टाकून त्याच्या नावावर पैशाची उचल होत असल्याचा भंडाफोड काटोल नगर परिषदेत झाला आहे.

ठळक मुद्दे कनिष्ठ लिपिक निलंबित

नागपूर : काटोल नगर परिषदेच्या सेवेत नसलेल्या व्यक्तीचे नाव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या यादीत टाकून त्याच्या नावावर पैशाची उचल होत असल्याचा भंडाफोड काटोल नगर परिषदेत झाला आहे. याप्रकरणी लेखा विभागातील कनिष्ठ शिक्षण लिपिक मनोज दामोधर वाघ याला मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी निलंबित केले आहे. वाघ याने बनावट खात्यावर ही रक्कम वळती करत गेल्या दीड वर्षात ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघ हा नगर परिषदेच्या लेखा विभागात कनिष्ठ शिक्षण लिपिक पदावर कार्यरत आहे. त्याने नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या यादीत एक अधिकचे डमी नाव टाकले. यासोबतच त्या नावाचे बँक खाते उघडण्यात आले. त्या खात्यात दर महिन्याला सेवानिवृत्ती वेतनसुद्धा जमा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम बँक खात्यात जमा झाली की, डमी बँक खातेदार उचल करून आपसात वाटून घेत होते. गत दीड वर्षापासून हा गोरखधंदा सुरू होता.हयात प्रमाणपत्राने झाली पोलखोल

सेवानिवृत्त कर्मचारी हयात असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयात डिसेंबर महिन्यात जमा करावे लागते. यंदा पालिका प्रशासनाला सर्व सेवनिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र, एका कर्मचाऱ्याचे प्रमाणपत्र आढळले नाही. याची सखोल चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :fraudधोकेबाजी