शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिटायर्ड सैनिकाची सख्ख्या भावानेच केली हत्या ! शेतीच्या तुकड्यासाठी विसरला रक्ताचे नाते; पेट्रोल टाकून मृतदेहही टाकला जाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:10 IST

आरोपी भाऊ अटकेत : कळमेश्वरच्या मोहगाव-सावंगी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वरः शेतातील पाणीवाटप कौटुंबिक वादातून व मोठ्या भावाने लहान भावाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव-सावंगी शिवारात शनिवारी रात्री घडली. अरुण रामाजी तुरारे (वय ४३, रा. वॉर्ड क्र. १५, धनगरपुरा, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर रामाजी तुरारे (वय ५३) याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वन विभागाचे पथक सर्चिग करत असताना, चंद्रशेखर व देवेंद्र यांच्या शेतालगतच्या नाल्याजवळ काही तरी जळत असल्याचे त्यांना दिसले. पाहणी केली असता, तेथे मानवी हाडे व मांस जळालेल्या अवस्थेत आढळले. याची माहिती कळमेश्वर ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे यांना देण्यात आली. पोलिस, ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनेच्या चार दिवसांपूर्वी बहीण लता झिले (रा. हिंगणा) ही अरुणकडे आली होती. शेतात जाण्यासाठी चंद्रशेखर हा अरुणला अडवत असल्याने, लताने जेसीबीच्या साहाय्याने चंद्रशेखर व देवेंद्र यांच्या शेतालगतच्या नाल्याजवळ रस्ता तयार केला. यावेळी चंद्रशेखर, अरुण व बहीण लता यांच्यात वाद झाला होता. हा प्रकार आरोपीच्या मनात घर करून बसला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अरुणची पत्नी ज्योत्स्ना (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खून व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण हा शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला १४ वर्षाचा तन्मय व दहा वर्षाचा सर्वेश अशी दोन मुले आहेत.

मृतक व आरोपी यांचे वडील रामाजी तुरारे यांचे निधन झाले असून, त्यांना तीन मुले व चार मुली आहेत. तिन्ही भावांमध्ये मोठा चंद्रशेखर, मधला अरुण (मृतक) आणि लहान देवेंद्र आहे. वडिलोपार्जित साडेचार एकर शेती तिघांमध्ये प्रत्येकी दीड-दीड एकर वाटून देण्यात आली होती. चंद्रशेखर हा सीआरपीएफमध्ये नोकरी करून तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाला असून, सध्या तो शेती करतो. देवेंद्र व चंद्रशेखर यांची मिळून तीन एकर शेती चंद्रशेखरच कसत होता. चंद्रशेखर हा हिंगणा येथे पत्नी व मुलासह राहत असून, देवेंद्रही हिंगणा येथे भाड्याने राहतो.

दुपट्ट्यावर रक्ताचे डाग आढळल्याने संशय

शनिवारी (दि. १३) सकाळी ९:३० वाजता अरुण हा पत्नी ज्योत्स्ना व मजूर अनिता बोंद्रे यांच्यासह शेतात गेला होता. अरुणने शेतालगत असलेले त्रिलोचन खरबडे यांचे पाच एकर शेत ठेक्याने घेतले होते. दुपारी तिघांनी शेतातच जेवण केले. त्यानंतर अरुण स्वतःच्या दीड एकर शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेला. त्यावेळी तो शेतात एकटाच होता, तर ज्योत्स्ना व अनिता कापूस वेचण्यासाठी दुसऱ्या शेतात गेल्या. शनिवारी सायंकाळी ५ वाजता ज्योत्स्ना शेतात परतल्या असता ट्रॅक्टर एकाच ठिकाणी सुरू अवस्थेत उभे होते. बाजूला अरुणच्या चपला व दुपट्टा दिसला. दुपट्ट्यावर रक्ताचे डाग आढळल्याने संशय बळावला. शोध घेऊनही अरुण न सापडल्याने मोहपा पोलिस चौकीत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.

३ वर्षां पासून वाद

मागील तीन वर्षांपासून शेतातील विहिरीचे पाणी, मोटर, पाइपलाइन, शेतातील रस्ता व शेतीच्या वाटणीवरून भावांमध्ये सतत वाद सुरू होता. या वादातून यापूर्वीही दोन वेळा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

जाळल्याची दिली कबुली

कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चंद्रशेखर तुरारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने अरुणची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Retired Soldier Killed by Brother Over Land Dispute in Kalmeshwar

Web Summary : A retired soldier, Arun Turare, was murdered by his brother, चंद्रशेखर, over a land dispute in Mohgaon-Savangi. The accused burned the body, attempting to destroy evidence. Police arrested चंद्रशेखर after he confessed to the crime; family disputes over land were ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर