सैन्यातील निवृत्त सैनिकाची बॅग केली परत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:55+5:302021-07-19T04:06:55+5:30
मिळालेल्या माहितीनुसार जगतसिंहपुर ओडिशा येथील रहिवासी भावेश कुमार भुजवात भोला भारतीय सैन्यदलात सैनिक म्हणून कार्यरत होते. शनिवारी ते कामठीवरू ...

सैन्यातील निवृत्त सैनिकाची बॅग केली परत ()
मिळालेल्या माहितीनुसार जगतसिंहपुर ओडिशा येथील रहिवासी भावेश कुमार भुजवात भोला भारतीय सैन्यदलात सैनिक म्हणून कार्यरत होते. शनिवारी ते कामठीवरू कटक येथे जाणार होते. परंतु रेल्वेगाडी रविवारी असल्यामुळे ते प्लॅटफार्म क्रमांक एकवर झोपले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना आपली बॅग जवळ दिसली नाही. त्यांनी त्वरीत लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानंतर कामठी येथे ड्युटीला असलेले लोहमार्ग पोलीस अनिल यादव, भगवान जायसवाल यांनी रेल्वेस्थानकावर तपासणी केली असता काही अंतरावरच भावेशची बॅग आढळली. बॅगमध्ये महत्वाचे कागदपत्र, १३५० रुपये रोख आणि मोबाईलसह ११ हजार ३५० रुपयांचे साहित्य होते. कागदोपत्री कारवाई केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी भावेशला बॅग परत केली. लोहमार्ग पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल भावेशने त्यांचे कौतुक केले. ही कारवाई इतवारी लोहमार्ग पोलिसातील सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
.......................