किरकोळमध्ये फळे महागच!

By Admin | Updated: September 19, 2014 00:55 IST2014-09-19T00:55:29+5:302014-09-19T00:55:29+5:30

सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी

Retail prices are expensive! | किरकोळमध्ये फळे महागच!

किरकोळमध्ये फळे महागच!

सफरचंद, डाळिंबाची प्रचंड आवक : भाव आटोक्यात
नागपूर : सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांमध्ये दरवाढीची शक्यता नाही, अशी माहिती विक्रेते पेंढारकर यांनी दिली.
सफरचंद स्वस्तच
मध्यंतरी पावसामुळे कळमन्यात सफरचंदची आवक अपेक्षेपेक्षा जास्त होती. सिमला येथून माल विक्रीस आला. २५ किलो पॅकिंगचा भाव दर्जानुसार ८०० ते १२०० रुपयांदरम्यान होता. ही स्वस्ताई ८ ते १० दिवसच राहिली. सध्या काश्मिरात वाहतूक खुली झाली आहे. लवकरच देशात सर्वत्र माल पोहोचविला जाईल. सध्या दिल्ली आणि चंदीगड येथून दररोज सफरचंदचे पाच ते सहा ट्रक कळमन्यात येत आहेत. भाव १३०० ते १७०० रुपयांदरम्यान आहेत. याशिवाय पावसाचा फटका डाळिंबाला बसल्याने मध्यंतरी आवक वाढली होती. शिवाय भावही उतरले होते. सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. ठोकमध्ये ६०० ते ७५० (१० किलो) रुपयादरम्यान भाव आहेत.
मोसंबीची आवक वाढली
कळमन्यात संपूर्ण विदर्भातून मोसंबी विक्रीस येत आहे. भाव टनानुसार आहेत. किलोनुसार १५ ते २० रुपये किलो भाव आहे. दररोज १ ते ३ टन मोसंबीचे ७० ते ७५ मेटॅडोर विक्रीस येत आहेत. तुलनेत संत्र्याची आवक कमी आहे. पाऊस नसल्याने आंबिया बारला आता सुरुवात झाली आहे. काटोल, कळमेश्वर, कोंढाळी या भागातून काही शेतकरी संत्रा आणीत आहेत. विक्री टनानुसार होत असली तरीही भाव दर्जानुसार १० ते १५ रुपये किलो आहे. दररोज दोन हजार डबे (१० किलो पॅकिंग) चिकू डहाणू (पालघर) येथून कळमन्यात येत आहेत. भाव १२० ते ४०० रुपयांदरम्यान (१० किलो) आहेत.
चिनी ‘फ्यूजी’ला मागणी
विदेशात उत्पादित होणाऱ्या फळांची चव नागपूरकरांच्या जीभेवर रेंगाळू लागली आहे. विदेशातून आयातीत होणाऱ्या फळांच्या मागणीत वाढ होत आहे. कळमन्यात आयात फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई येथे ही फळे उतरविली जातात. तेथून ती कळमन्यात आणली जातात. आयात फळांमध्ये सफरचंदाचे प्रमाण जास्त आहे. चीनमधील ‘फ्यूजी’ सफरचंद मागणीनुसार विक्रेते मागवित आहेत. अनेक आजारांवर ही फळे उपयोगी ठरत असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. तुलनेने कमी भाव व आकर्षक पॅकेजिंग हेसुद्धा त्यातील एक मुख्य कारण आहे. फळांचा दर्जाही चांगला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Retail prices are expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.