लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला.
बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 20:53 IST
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला.
बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’
ठळक मुद्देविभाग राज्यात तळाशी