निर्बंध कायम, दिलासा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST2021-07-24T04:06:48+5:302021-07-24T04:06:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील, अशी नागरिक व व्यापाऱ्यांना ...

Restrictions are permanent, not a relief | निर्बंध कायम, दिलासा नाहीच

निर्बंध कायम, दिलासा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील, अशी नागरिक व व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलासा दिलेला नाही. ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीत जुने निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहू शकणार असून शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत.

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आदेश जारी करत निर्बंध जैसे थे राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाबाधितांचा दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता लक्षात घेतली तर नागपूर लेव्हल-१ वर आहे. मात्र राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच लेव्हल-३ चे निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातदेखील कायम राहतील.

कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व्यापाऱ्यांकडून दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी होत होती. यासंदर्भात रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याचा प्रस्तावदेखील तयार झाला होता. मात्र आता असे होणार नाही. शनिवार व रविवारी तर केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे. रेस्टॉरंटला दुपारी ४ वाजेपर्यंतच डाईन ईन सुविधेची परवानगी देण्यात आली आहे. होम डिलिव्हरी सुरू राहील. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहे. कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे.

Web Title: Restrictions are permanent, not a relief