शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

गोवारी विद्यार्थ्यांच्या रोखल्या व्हॅलिडिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:53 IST

Caste Validity issue for Gowari २४ वर्षाच्या संघर्षानंतर गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले. त्यासाठी समाजाला ११४ लोकांचा बळी द्यावा लागला. जात प्रमाणपत्र मिळत असल्याने गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली. पण ही पायवाट काहीच अंतरावर थांबली. लालफीतशाहीचा अडसर या वाटेत आला. जातवैधता प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य पुन्हा अंधारात आले आहे.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात समाजामध्ये असंतोष

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : २४ वर्षाच्या संघर्षानंतर गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले. त्यासाठी समाजाला ११४ लोकांचा बळी द्यावा लागला. जात प्रमाणपत्र मिळत असल्याने गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली. पण ही पायवाट काहीच अंतरावर थांबली. लालफीतशाहीचा अडसर या वाटेत आला. जातवैधता प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य पुन्हा अंधारात आले आहे.

गोवारी समाजाला आदिवासींच्या सवलती लागू व्हाव्यात यासाठी मोठा संघर्ष समाजाला करावा लागला. उच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारींच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला. तरीसुद्धा गोवारींना जातवैधता प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यासाठी पुन्हा न्यायालयात जावे लागले. २५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश शासनाला दिले. तेव्हापासून फेब्रुवारी २०२० पर्यंत गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरने जातवैधता प्रमाणपत्र दिले.

पण पुढे सरकार गोवारींच्या बाजूने दिलेल्या निर्णयावर स्टे मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला स्टे दिला नाही. पण अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरच्या सहआयुक्तांनी मार्च महिन्यापासून वैधता प्रमाणपत्र समाजाला दिले नाही. त्यामुळे समाजामध्ये अधिकाऱ्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे.

 

 हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत

न्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी विभागानेसुद्धा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. पण अधिकारी हेतुपुरस्सरपणे समाजाची अडवणूक करीत आहेत. उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा पार पडल्या आहेत. विद्यार्थ्यांजवळ वैधता प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश अडचणीत येणार आहेत. त्यामुळे येत्या २० तारखेला ‘नीट’ची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांचे पालक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना

टॅग्स :Caste Certificateजात वैधता प्रमाणपत्रnagpurनागपूर