शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

नागपूर मनपातील अभियंत्यांवर समन्वयाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:24 PM

महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विविध विभागातील १५ अभियंत्यांची त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कामासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देप्रशासकीय सुविधा : १५ अभियंत्यांवर सोपविला इतर कार्यभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विविध विभागातील १५ अभियंत्यांची त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कामासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.नगरयंत्री एम.एच. तालेवार यांच्याकडे प्रकल्प-सिमेंट काँक्रिट रस्ते फेज-२ मधील काही कामे,डीपी रोडची जबाबदारी आहे. याशिवाय ते विशेष शासकीय अनुदान प्रकल्प, शहरातील रस्ते(फूटपाथ), आकृतिबंध विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. विकास अभियंता सतीश नेरळ यांच्याकडे कंत्राटदार, प्रकल्प सल्लगार, बांधकाम अभियंता नोंदणी, मुख्यालयातील इमारतीच्या कामाचा समन्वय आदी जबाबदारी आहे. त्यांच्याकडे सर्वशिक्षा अभियान, पुतळे व स्मारके नामकरण, पर्यटन व तीर्थक्षेत्र निधीतील कामाचा समन्वय राखण्याची जबाबदारी सोपविली आहे. झोन क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक यांच्याकडे मध्य व पश्चिम स्थानिक विकास निधीतील कामांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे पुलाची देखभाल व दुरुस्ती, उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम व रेल्वे विभागाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. स्लम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाटे यांच्याकडे अल्पसंख्यक बहुलनागरी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, दलित वस्ती व रेन वॉटर हार्वेस्टिंगचे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे.वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता आसाराम बोदिले यांच्याकडे ५० कोटींच्या विशेष निधीअंतर्गत सिवरेज लाईनची कामे, वाहतूक व परिवहन विभागाचे प्रदूषण नियंत्रण अहवाल तयार करणे व विदर्भ विकास मंडळाची कामे व समन्वयाची जबाबदार दिली आहे.लकडगंज झोनचे कार्यकारी अभियंता अनिल कडू यांच्याकडे स्मार्ट सिटी व पारडी उड्डाणपूल व जमीन अधिग्रहण समन्वय अधिकारी राहतील. कार्यकारी अभियंता आर. वाय. भुतकर यांच्याकडे पाचपावली पुलाची दुरुस्ती व समन्वयाची जबाबदारी दिली आहे. अनिरुद्ध चौंगजकर नाग व पिवळी नदीचे सौंदर्यीकरण व तलाव संवर्धन समन्वय अधिकारी असतील. जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याकडे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्रकल्पाच्या समन्वयकाची जबाबदारी दिली आहे.कार्यकारी अभियंता(डीपीडीसी) नरेश बोरकर यांच्याकडे ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, मेट्रो रेल्वेशी समन्वय व जागा हस्तांतरण प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. झोनचे प्रभारी कार्यकारी अविनाश बाराहाते यांच्याकडे कोर्ट केसेस समन्वय व मनपा इमारतीची देखभाल, सुगम्य भारत अभियानाचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एम.जे. कुकरेजा यांच्याक डे नासुप्रतर्फे हस्तांतरित ५७२ व १९०० अभिन्यास समन्वयाची जबाबदारी दिली आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका