‘रन फॉर युनिटी’ला प्रतिसाद
By Admin | Updated: November 9, 2014 00:49 IST2014-11-09T00:49:08+5:302014-11-09T00:49:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्रीय एकात्मता’ घोषणेला प्रतिसाद देत माऊंट लिटेरा झी स्कूलने शनिवारी ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले.

‘रन फॉर युनिटी’ला प्रतिसाद
माऊंट लिटेरा झी स्कूलचा उपक्रम : राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्रीय एकात्मता’ घोषणेला प्रतिसाद देत माऊंट लिटेरा झी स्कूलने शनिवारी ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले.
या उपक्रमांतर्गत संविधान चौकातून रॅली काढण्यात आली तर समारोप व्हेरायटी चौकात झाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर-२ चे उपाध्यक्ष राजे मुधोजी भोसले यांनी रॅलीला झेंडी दाखविली आणि उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले आणि महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे बॅनर होते.
प्राचार्य स्वाती पटेल आणि विभागीय व्यवस्थापक विलास कार्लेकर यांनी रॅलीत सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले.
रॅलीसाठी प्रमुख रश्मी कोहली, मीता चौधरी, मिलन पुटाटुंडा, क्लाऊड कॉसमॉस, आशुतोश पळसकर, गीतांजली सयाम, आरती शर्मा, अंजली भामर्गदिवे यांनी परिश्रम घेतले. तहमीना अन्सारी यांनी सर्वांचे आभार मानले. (वाणिज्य प्रतिनिधी)