रेजोनन्स नागपूरच्या वर्गांना गुरुवारपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:39+5:302021-02-05T04:46:39+5:30
नागपूर : विदर्भामध्ये यशाचा मार्ग तयार करणाऱ्या रेजोनन्स नागपूरच्या वतीने येत्या २८ जानेवारीपासून ऑफलाइन वर्गांना सुरुवात करण्यात येणार आहे. ...

रेजोनन्स नागपूरच्या वर्गांना गुरुवारपासून सुरुवात
नागपूर : विदर्भामध्ये यशाचा मार्ग तयार करणाऱ्या रेजोनन्स नागपूरच्या वतीने येत्या २८ जानेवारीपासून ऑफलाइन वर्गांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याकरिता सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.
रेजोनन्समधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय वर्ग खोल्यांमध्ये टेम्प्रेचर गन, फुट ऑपरेटेड हॅण्ड सॅनिटायजर व अल्ट्रा व्हायलेट स्टेरीलाजर ठेवण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंग व इतर आवश्यक सुविधांचे प्रत्याक्षिक करण्यात आले आहे. भावी डॉक्टर व आयआयटीयनचे स्वागत करण्यासाठी रेजोनन्स सज्ज आहे.
३१ जानेवारी व ७ फेब्रुवारी रोजी नॅशनल स्कॉलरशिप ॲडमिशन टेस्ट होणार आहे. यातील रेसो वरदान हा कार्यक्रम आयआयटी, एम्स व जीएमसी येथे शिक्षण घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. या चाचणीतून विद्यार्थ्यांना रिवॉर्ड व स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याकरिता सर्वोत्तम ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या विद्यार्थ्यांना शुल्कात १०० टक्के सूट दिली जाईल. एवढेच नाही तर, वसतिगृह आणि इयत्ता अकरावी व बारावीच्या खर्चातही सूट दिली जाईल. गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणीमुळे पुढे येऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेजोनन्सने केले आहे.
या चाचणीकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा फिजिकल अर्ज भरून नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांना झासी राणी चौक, वर्धा रोड (साई मंदिरपुढे) व छाप्रूनगर चौक येथील रेजोनन्सच्या कार्यालयात भेट देऊन अधिक माहिती मिळवता येईल. नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. ऑनलाइन अर्ज डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट रेजोनन्स डॉट एसी डॉट इन या वेबसाईटवर आहे.