शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

‘संकल्प’अडकला आर्थिक टंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:21 IST

महापलिका निवडणुकीत विकासाच्या अजेंड्यांवर विश्वास ठेवून मतदारांनी भाजपला विक्रमी बहुमताने सलग तिसºयांना सत्ता दिली.

ठळक मुद्देनगरसेवकांची चिंता वाढली : जुन्या कामांना प्राधान्य; नव्यांना तूर्त मंजुरी नाही

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापलिका निवडणुकीत विकासाच्या अजेंड्यांवर विश्वास ठेवून मतदारांनी भाजपला विक्रमी बहुमताने सलग तिसºयांना सत्ता दिली. परंतु. गेल्या सहा महिन्यात प्रभागातील नवीन विकास कामांना मंजुरी मिळालेली नाही. डिसेंबर महिन्यात आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर के ल्यानंतर स्थायी समितीच्या प्रस्तावित कामांना कात्री लागणार आहे. नगरसेवकांची फाईल मंजुरीसाठी भटकंती सुरू आहे. निधी मिळत नसल्याने हमरीतुमरीवर येत आहे. नगरसेवक व पदाधिकारी अन् अधिकाºयांत दररोज खटके उडत आहे. परिस्थितीचा विचार करता अर्थसंकल्प सादर करताना केलेला विकासाचा संकल्प आर्थिक टंचाईत अडकला आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानुसार विकास कामांसाठी निधीची तरतूद प्रस्तावित होती. परंतु गेल्या साडेपाच ते सहा महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत ६४१ कोटी जमा झाले. वास्तविक अर्थसंकल्पाचा विचार करता १ हजार कोटींहून अधिक महसूल जमा होणे अपेक्षित होते. महापालिकेला दर महिन्याला आवश्यक खर्चासाठी ८५ ते ९० कोटींची गरज असते. आवशयक खर्च होत असला तरी विकास कामांसाठी फारसा निधी शिल्लक राहात नाही. नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रभागातील विकास कामांना सप्टेंबर पर्र्यत मंजुरी दिली जाते. आॅक्टोबरपासून कामांना सुरुवात केली जाते.महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊ न डिसेंबर महिन्यात आयुक्त पुढील वर्षाचा प्रस्तावित व वित्त वर्षाचा सुधारित अर्थसंक ल्प सादर करतात. यात स्थायी समितीने सुचविलेल्या विकास कामांना कात्री लावली जाते. महापालिकेला जीएसटी अनुदान स्वरुपात १०६५ कोटी तर अनुदान व मुद्रांक शुल्कापोटी ७४० कोटी शासनाकडून अपेक्षित आहे. परंतु गेल्या साडेपाच महिन्यात शासकीय अनुदान म्हणुन २५८ कोटी, सहायक अनुदान (जीएसटी व एलबीटी) २१३ कोटी असे एकूण ४६१ कोटी मिळाले आहे.मालमत्ता करातून वर्षाअखेरीस ३९२.१९ कोटी अपेक्षित असताना गेल्या साडेपाच महिन्यात ५५ कोटींचाच महसूल जमा झाला. पाणीपट्टीतून १७० कोटींची अपेक्षा असताना ४२ कोटी, बाजार विभागाकडून १३.५० कोटी अपेक्षित असताना २.१० कोटी जमा झाले. नगररचना विभागपासून १०१.२५ कोटी गृहित असताना २६ कोटी जमा झाले. इतर विभागाचीही अवस्था अशीच आहे. साडेपाच ते सहा महिन्यात हजार कोटीहून महसूल जमा होणे अपेक्षित होते. परंतु हा आकडा ६५० कोटींच्या पुढे गेलेला नाही. अर्थसंकल्पानुसार निधी तिजोरीत जमा होत नसल्याने प्रभागातील लहानसहान कामे, तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांना याचा फटका बसला आहे.जुन्यांना निधी, नव्यांना प्रतीक्षाआर्थिक टंचाईतही वजनदार नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांना मंजुरी मिळत आहे. दुसरीकडे सत्तापक्ष व विरोधी पक्षातील नवीन नगरसेवकांना अद्याप फाईल मंजुरीचे गणित जमलेले नाही. त्यांनी सादर केलेल्या फाईल निधी उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविल्या जात आहे. यामुळे वाद होत आहे. काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर व स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यात फाईल मंजुरीवरून असाच वाद झाला. विकास कामात भेदभाव झाल्यास पुणेकर यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. भाजपाच्याही नगरसेवकांची अशीच अवस्था आहे. परंतु त्यांना स्पष्ट बोलता येत नसल्याने अस्वस्थ आहेत.