नेत्रदानाचा संकल्प करा

By Admin | Updated: August 26, 2014 01:04 IST2014-08-26T01:04:16+5:302014-08-26T01:04:16+5:30

ज्यांना नत्रत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय? त्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय? नसल्यास अशा दृष्टिहीन देशबांधवांचाही जरूर विचार करा, त्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा,

Resolve eyesight | नेत्रदानाचा संकल्प करा

नेत्रदानाचा संकल्प करा

मेडिकल : नेत्रदान पंधरवड्याला रॅलीने सुरुवात
नागपूर : ज्यांना नत्रत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय? त्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय? नसल्यास अशा दृष्टिहीन देशबांधवांचाही जरूर विचार करा, त्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी येथे केले.
मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर यादरम्यान २९ व्या ‘नेत्रदान पंधरवड्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार दीनानाथ पडोळे होते. मंचावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, विभागप्रमुख डॉ. अशोक मदान उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी ‘नेत्रदान’ या विषयावर काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे व ‘नेत्रदानाचे महत्त्व आणि ते कसे करावे’ या विषयावर चित्रफितीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आ. पडोळे यांनी नेत्रदानाविषयी अंधश्रद्धा दूर होणे गरजेचे असून प्रत्येकाने जाता जाता डोळे दान करावे, असे आवाहन केले. डॉ. मदान यांनी मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची माहिती दिली. कार्यक्रमाला डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. गुप्ता, डॉ. सहस्रभोजने, डॉ. नरेंद्र तिरपुडे आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मेडिकलचे विद्यार्थी, नर्सिंगचे विद्यार्थी, एनसीसीचे कॅडेट व नेत्र विभागाचे डॉक्टर व कर्मचारी मिळून ५०० जण सहभागी झाले होते.
रॅली नेत्ररोग विभागापासून ते मेडिकल चौक, क्रीडा चौक ते तुकडोजी महाराज चौक येथून परत मेडिकल कॉलेज परिसरात आली. डॉ. चंदन टिपले यांनी क्रीडा चौक येथे नेत्रदानाविषयी मार्गदर्शन केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. मदान यांच्या मार्गदर्शनात डॉ. मोना देशमुख, डॉ. दिलीप कुमरे, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राहुल डगवार, डॉ. नीलेश गद्देवार, डॉ. स्नेहल बोंडे , डॉ. जयश्री इखार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Resolve eyesight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.