शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:37 IST

निवडणुका का हरलो याची कारणमीमांसा व्हावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, तसेच आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व मौखिक जाहिरातीवर अधिक भर देण्यात यावा, काँग्रेसने केलेल्या विविध कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचली पाहिजे, यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर : पक्षकार्यालयात अनुसूचित जाती उपसमितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुका का हरलो याची कारणमीमांसा व्हावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, तसेच आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व मौखिक जाहिरातीवर अधिक भर देण्यात यावा, काँग्रेसने केलेल्या विविध कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचली पाहिजे, यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकासजी ठाकरे अध्यक्षस्थानी होते. अनुसूचित जाती उपसमितीचे अध्यक्ष किशोर गजभिये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनुसूचित जाती, जमाती मतदार संघात काँग्रेसचा पराभव का झाला, काँग्रेसच्या उमेदवारांना एकट्याच्या बळावर निवडणूक का लढावी लागते, अशा विषयांवर मंथन झाले पाहिजे, असे मत किशोर गजभिये यांनी मांडले. नियोजनपूर्वक निवडणुकांना सामोरे गेलो तर काँग्रेसला कोणतीही निवडणूक जिंकणे कठीण नाही. यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून शेतकरी, शेतमजूर, यांच्यावर होत असलेले अन्याय, देशापुढील आव्हाने,काँग्रेसची स्थापना व देशाच्या विकासातील योगदान याची माहिती सर्वसामान्यांना करून देण्याचा संकल्प करण्यात आला.व्यासपीठावर अनु.जाती उपसमितीचे सदस्य कृष्णकुमार शेंडे, सुरेश भोयर,शकुर नागाणी,अतुल लोढे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार,रमण पैगवार,बंडोपंत टेंभुर्णे,डॉ.गजराज हटेवार,जयंत लुटे, प्रा.दिनेश बानाबाकोडे,अनु.जाती शहर अध्यक्ष विवेक निकोसे, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर, प्रशांत धवड,नितीन साठवणे आदी उपस्थित होते.प्रारंभी विकास ठाकरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री डॉ.गजराज हटेवार यांनी केले आणि आभार अनु.जाती समितीचे भाऊराव कोकणे यांनी मानले. यावेळी अण्णाजी राऊ त, अशरफ खान, अ‍ॅड. अक्षय समर्थ, स्नेहल दहीकर, रश्मी धुर्वे, पंकज थोरात,अशरफ खान, चंद्रकांत बडगे, महेश श्रीवास, विलास भालेकर, मिलिंद सोनटक्के, वासुदेव ढोके, अर्चना बडोले,मालिनी खोब्रागडे, सूरज आवळे, अतिक कुरैशी, अशरफ खान, धरमकुमार पाटील, सुधीर जाधव,बॉबी दहिवाले,दर्शनी धवड अंबादास गोडाणे, भास्कर चाफले,उज्ज्वला बनकर,नितीन बन्सोड, अनिल मेश्राम,ओमप्रकाश मोहोतो, राजेश कुंभलकर,संजय झाडे, रवी गाडगे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी माजीमंत्री पतंगराव कदम यांना आदरांजली वाहण्यात आली.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर