शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एससींच्या विकासासाठी आरक्षण महत्त्वाचे : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:59 IST

शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देजागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित जागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी डॉ. थोरात यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. थोरात म्हणाले, लोकांच्या मताने लोक प्रतिनिधी निवडून येत असल्यामुळे लोकशाहीची घसरण झाली नाही. परंतु वैचारिकतेत, धर्मनिरपेक्षतेतही घसरण झाली आहे. प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. परंतु काही राज्यात धर्माच्या आधारावर सत्ता स्थापन होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाचे एससी, एसटीबाबतचे धोरण बदलल्यामुळे दलितात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. राज्यात अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. मागील पाच वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी योग्य ती तरतूद न केल्यामुळे त्याचा विकासावर परिणाम झाला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात येत असल्यामुळे एससींचा मार्ग बंद झाला आहे. विकास हा गरिबापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दारिद्र्य संपेल असा विकास व्हावा. शेती, उद्योगधंद्यांचे उत्पन्न वाढावे, पण त्यासोबतच गरिबांचेही उत्पन्न वाढण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. परंतु गरिबीत महाराष्ट्र ११ व्या क्रमांकावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या खासगीकरणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शैक्षणिक विषमता वाढून त्याचा परिणाम रोजगारावर होईल. शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असून खासगी कंपन्यातही आरक्षण मिळत नसल्यामुळे एससींच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.आंबेडकरी चळवळीतील गटबाजी धोकादायकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून महाडचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी उभारलेल्या चळवळीचे गटातटात विभाजन झाले.एससींच्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे या विभाजनाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा डॉ. थोरात यांनी दिला.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षण