डीपी रोडचे आरक्षण वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 03:46 IST2016-05-04T03:46:05+5:302016-05-04T03:46:05+5:30
रस्त्यांसाठी आरक्षित असलेले परंतु नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलेले भूखंड नियमित करण्याचा निर्णय

डीपी रोडचे आरक्षण वगळले
बांधकाम होणार नियमित : मौजा बाबुळखेडा, सोमलवाडा व सोनेगावला लाभ
नागपूर : रस्त्यांसाठी आरक्षित असलेले परंतु नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलेले भूखंड नियमित करण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे. यात डीपी (विकास आराखडा) रोडचाही समावेश आहे. मौजा बाबुळखेडा, सोमलवाडा व सोनेगाव अंतर्गत येणाऱ्या अभिन्यासातील संबंधित आरक्षणाने बाधित भूखंडांबाबत संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ या भागातील शेकडो नागरिकांना होणार असून त्यांनी केलेले बांधकामही नियमित करण्यास मदत होणार आहे.
नागपूर सुधार प्रन्यासकडे नागपूर शहरातील १९०० अभिन्यासातील नागरिकांनी महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ अन्वये भूखंड नियमितीकरणाकरिता मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. परंतु अभिन्यासात काही भागावर मंजूर विकास आराखडा २००१ अंतर्गत वेगवेगळ्या १२.०० मीटर,१८.०० मीटर,२४.०० मीटर व ३०.०० मीटर रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण दर्शविण्यात आले होते. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घराचे बांधकाम केले होते. विकास आराखड्यातील आरक्षणामुळे नागरिकांचे भूखंडक नियामितीकरणाचे अर्ज दीर्घकाळापासून प्रलंबित होते. मौजा बाबुळखेडा, सोमलवाडा तसेच मौजा सोनेगांव अंतर्गत अभिन्यासातील भूखंड नियामितीकरणाचा निर्णय घेतला आहे.
मौजा बाबुळखेडा व मौजा सोमलवाडा मधील ३० मी. रुंदीचा डी.पी. रोड आरक्षणातून वगळण्यात आला आहे. मौजा बाबुळखेडा मधील सुयोग नगर ते इंडस्ट्रीयल विकर सेक्शनच्या अभिन्यासापर्यंत ( सिरसपेठ गृह.नि.सह.संस्था,खसरा क्र. ५८/१, जोगी नगर ले आऊट,खसरा क्र. ६१/१ग,६३/२ख, बच्चुसिंग ले- आऊट, खसरा क्र.६३/३ घ, गावंडे ले-आऊट,खसरा क्र. ६३/१ क, प्रीती गृह.नि.सह .संस्था,खसरा क्र. ६३/१ ड, इंडस्ट्रीयल विकर सेक्शन,खसरा क्र.६३/१ ड) या भागाचा यात समावेश आहे. मौजा सोमलवाड्यातील युनिक को. आॅप.हाऊ. सोसायटी, खसरा क्र. ७२/१,२, शिल्पा को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र. ७०/३, ७१/१,७२/२,७०, साई कृपा को. आॅप.हाऊ.सोसायटी,खसरा क्र.७०/२, न्यू लोककल्याण को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र. ७०/१ , जय दुर्गा को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र. ६९,७१/१ क,समाज भूषण को. आॅप.हाऊ.सोसायटी,खसरा क्र. ६८, संत गजानन को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र. ६८/१,४ संताजी को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र ५२/२,८०/४,५, ला याचा फायदा होईल. रेणुका को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र. ५२/२,सप्तश्रुंगी को. आॅप.हाऊ.सोसायटी, खसरा क्र.८१( पार्ट), पंचतारा को. आॅप.हाऊ.सोसायटी,खसरा क्र. ११४, आदिवासी को. आॅप. हाऊ. सोसायटी, खसरा क्र. ११०/११,६,९ (पार्ट), कृषीनारा को. आॅप. हाऊ.सोसायटी, खसरा क्र. १०७/११०, फर्थ को. आॅप.हाऊ. सोसायटी,खसरा क्र. १०७, कृष्ण विहार हाऊ. सोसायटी, खसरा क्र. १०५, १०६, विनोबा ग्राम को. आॅप. हाऊ. सोसायटी खसरा क्र- ८८/२, संत तुकडोजी को. आॅप. हाऊ. सोसायटी, खसरा क्र. 99 (पार्ट),सुरज को. आॅप. हाऊ. सोसायटी, खसरा क्र. ९८/१,२, सुरज को. आॅप. हाऊ. सोसायटी,खसरा क्र.९७/१,२ मधील १८.०० मी.डी.पी. रोडपर्यंत वरीलप्रमाणे अभिन्यासातील ३०.०० मी. डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्यात आलेले आहे. मौजा-बाबुलखेडा येथील १८.०० मीटर रुंद रस्ता, बिनाखी सोसायटी खसरा क्र. ८४/१-२-३,ब) २४.०० मीटर रुंद रस्त्याला १८.०० मी. केल्यामुळे यामध्ये लाभार्थी संस्था, एकमत सोसायटी खसरा क्र. ७४/२ ते गगनदीप सोसायटी, खसरा क्र. ७६(पार्ट), एकमत को. आॅप. हाऊ.सोसायटी, खसरा क्र. ७४/२, मालीक मकबुजा लेआऊट, खसरा क्र- ७६ पार्ट, जयवंत ठाकुर लेआऊट खसरा क्र. ७६/१ पार्ट, गगनदीप गृह. नि. सह. संस्था, खसरा क्र. ७६/१ हा रस्ता वगळण्यात आला आहे. याशिवाय श्रीहरी नगर, खसरा क्र. ६०, हावरापेठ, खसरा क्र. ७२ व बच्युसिंग लेआऊट, खसरा क्र. ६३/३ मधील १२.०० मीटर रुंद रस्ता तसेच पार्वती नगर, खसरा क्र. ५४/३ मधील १८.०० मीटर रुंद रस्ता वगळण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
दक्षिण व दक्षिण पश्चिमला लाभ
४ नासुप्रने मौजा बाबुलखेडा, सोमलवाडा व सोनेगाव येथील ले-आऊटमध्ये रस्त्यांसाठी आरक्षित जागेवर झालेली बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ३५ अभिन्यासातील ५६० भूखंडाचे नियमितीकरण करण्यात येणार आहे. नासुप्रच्या या निर्णयाचा लाभ दक्षिण नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपुरातील भूखंड धारकांना मिळणार आहे. पश्चिम व उत्तर नागपुरातही अशा आरक्षणाने बाधित असलेल्या भूखंडधारकांची संख्या मोठी आहे. या आरक्षणांबाबत नासुप्रचा असाच निर्णय घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.