शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

नदीतून बचावले, रुग्णालयात कापला केक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

नागपूर : जन्मदिनाचा क्षण असेल, तुम्ही ताे साजरा करण्यासाठी आप्तेष्टांसाेबत पिकनिकला गेले आणि या आनंदाच्या क्षणी एखादी जीवघेणी घटना ...

नागपूर : जन्मदिनाचा क्षण असेल, तुम्ही ताे साजरा करण्यासाठी आप्तेष्टांसाेबत पिकनिकला गेले आणि या आनंदाच्या क्षणी एखादी जीवघेणी घटना घडली आणि त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर निघाले तर? जीवावर बेतणारा असा प्रसंग अनुभवणाऱ्याची मनाेदशा काय असेल? अशीच परिस्थिती साैंसरजवळ घाेगरा नदीच्या धबधब्यात फसलेल्या नागपूरच्या कुटुंबासाेबत घडली. ७ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर पडलेल्या या कुटुंबातील निकिता यांचा जन्मदिन साजरा झाला ताे थेट रुग्णालयात. निकिता कधीही त्यांचा हा जन्मदिन विसरणार नाहीत.

जामसावळीजवळ घाेगरा वाॅटरफाॅलमधून बचावलेल्या १२ लाेकांच्या समूहाची ही गाेष्ट आहे. हे लाेक पिकनिकसाठी गेले हाेते. तत्पूर्वी त्यांनी जामसावळी मंदिरात पूजा केली. अंबाघाट नदीच्या निसर्गसाैंदर्याचा आनंद घेताना कधी त्यांच्या जीवावर बेतले हे त्यांनाही कळले नाही. धबधब्याचा आनंद घेताना त्यांचा ग्रुप अचानक वाढलेल्या नदी प्रवाहाच्या मधाेमध फसला. प्रशासन व पाेलिसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी त्यांना साैंसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हालहवालाची चाैकशी केल्यानंतर त्यातील एक महिला निकिता यांचा जन्मदिन असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित केकची व्यवस्था केली. नायब तहसीलदार छवी पंथ यांच्या उपस्थितीत केक कापून रुग्णालयातच त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या सर्व लाेकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रशासनाला ७ तास लढावे लागले पण मानवतेच्या दृष्टीने घाबरलेल्या लाेकांचे मनाेबल वाढविण्याचे प्रशासनाचे कार्य प्रशंसनीय ठरले.

आम्ही सर्व सुरक्षित

नागपूरच्या यशाेधरा पाेलीस स्टेशनअंतर्गत पिवळी नदी व वनदेवीनगर भागातील लाेक या समूहात हाेते. त्यातील एका महिलेने सांगितले, नदीची धार वाढल्याने प्रचंड भीती वाटली हाेती. यानंतर माेबाईलच्या माध्यमातून कुटुंबीयांना माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने प्रशासन व पाेलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन चालविले. गाेताखाेरांच्या मदतीने खाद्यसाहित्य पुरविण्यात आले. पाणी कमी हाेताच बचाव पथकाचे लाेक त्यांच्यापर्यंत पाेहचले आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यावेळी बचाव पथकाचे लाेक आमच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हते. बाहेर निघाल्यानंतर रुग्णालयात तपासणी करण्यात आली आणि मैत्रिणीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. त्यानंतर आम्ही नागपूरकडे निघालाे. सुरक्षित घरी पाेहचल्याचा आनंद आहे पण ताे प्रसंग विसरणे कठीण आहे.

बचाव पथकाने यांना केले रेस्क्यू

घोघरा वॉटरफॉलच्या प्रसंगातून बाहेर आलेल्यामध्ये पिवळी नदी भागातील ५० वर्षीय विद्याबाई राजू गुजर, बादल राजू गुजर (३०), प्रिया गुजर (२५), निकिता गुजर (२४), चंद्रजित तिरपुडे (४०), काेमल तिरपुडे (३०), अयांश तिरपुडे (८), शिवानी पराते (२२), यश पराते (२०), ग्लाेही पराते (८) आणि वनदेवीनगर येथील रहिवासी ४० वर्षीय काेकिळा दाऊसकर यांचा समावेश आहे.