रेशीमबाग मैदानाचा होणार विकास
By Admin | Updated: August 31, 2014 01:13 IST2014-08-31T01:13:04+5:302014-08-31T01:13:04+5:30
शहराच्या मध्यभागी असलेल्या रेशिमबाग मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रविंद्र भोयर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मैदानाला भव्य संरक्षणभिंत व आतमध्ये

रेशीमबाग मैदानाचा होणार विकास
अॅथ्लॅटिक ट्रॅक व संरक्षणभिंत : छोटू भोयर यांच्या प्रयत्नांना यश
नागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या रेशिमबाग मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रविंद्र भोयर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मैदानाला भव्य संरक्षणभिंत व आतमध्ये अॅथलॅटिक ट्रॅक उभारण्यात येणार असून यासाठी दीड कोटी रु पये मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडापटू व नागरिकांना सुसज्ज असे मैदान लवकरच मिळणार आहे.
शहराच्या मध्यभागी भव्य मैदान असून देखिल याचा लाभ नागरिकांना घेता येत नव्हता. मैदानाला संरक्षणभिंत नसल्याने मैदानात गैरसामाजिक घटकांचा बोलबाला होता. त्यामुळे नागरिक येथे जाणे टाळत होते.
मात्र डॉ. छोटू भोयर यांच्या पाठपुराव्यामुळे मैदानाच्या सुरिक्षततेसाठी भव्य संरक्षण भिंत व खेळाडूंसाठी आधुनिक अॅथलॅटिक ट्रॅक उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दिड कोटी रु पयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. त्यासोबतच शहरातील खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज व्यासपिठ उपलब्ध करु न देण्यासाठी आपण किटबद्द असल्याचे ना.सु.प्रचे विश्वस्त डॉ. भोयर यांनी सांगितले.
यानंतर मैदानात चेंजिंगरुम, शैचालय ब्लॉक आदी सुविधा उभारण्यासाठी विविध प्रस्ताव विचाराधिन असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
डॉ. भोयर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
शहरातील प्रथम
भव्य अॅथ्लॅटिक ट्रॅक
उर्जाप्राप्तीसाठी खेळाडूंना रनिंग करणे गरजेचे असते. यामध्ये सराव करताना त्यांच्या गुडघ्यांना ईजा व त्रास टाळण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंसाठी अॅथलॅटिक ट्रॅक तयार करण्यात येतो. या सुविधा शहरातील खेळाडूंना मिळाव्यात या उद्देशाने डॉ. भोयर यांनी शहरातील मध्यस्थानी असलेल्या रेशिमबाग मैदानाला आधुनिक स्वरु प देण्यासाठी प्रयत्न केले. या ट्रॅकमध्ये इलॅस्टीक प्रमाणे लैचिकता असल्याने यावर सराव करणार्र्यांना गुडघ्यांचा त्रास होत नाही. या प्रकारचा भव्य असा शहरातील प्रथम ट्रॅक ठरणार आहे हे विशेष.