मागितले जाताहेत ५, पर्याय केवळ एका डॉक्युमेंटचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:20+5:302021-06-24T04:08:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुठल्याही कारणासाठी वीज बिलावरील नाव बदलवायचे असेल तर ते आता अतिशय कठीण झाले आहे. ...

Requested 5, option of only one document | मागितले जाताहेत ५, पर्याय केवळ एका डॉक्युमेंटचा

मागितले जाताहेत ५, पर्याय केवळ एका डॉक्युमेंटचा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुठल्याही कारणासाठी वीज बिलावरील नाव बदलवायचे असेल तर ते आता अतिशय कठीण झाले आहे. या कामासाठी महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात गेले असता हे काम आता ऑनलाईन झाल्याचे सांगितले जाते. परंतु या कामासाठी एकूण ५ दस्तावेज देणे आवश्यक आहे. मात्र ऑनलाइन अर्जात केवळ एकच दस्तावेज (डॉक्युमेंट)अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत ना कार्यालयात गेल्यावर काम होत आहे ना ऑनलाईन होत आहे.

वीज बिलावरील नाव बदलवण्यासाठी लोकांना होत असलेला त्रास कमी करण्यासाठीच ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याचा दावा महावितरणने केला आहे. या कामासाठी सेल डीड, संपत्ती कर जमा करण्याची पावती, १०० रुपयाचे स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, आणि विजेचे बिल देणे आवश्यक आहे. जर संपत्तीवर एकापेक्षा अधिक व्यक्तींची नावे असेल तर १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. परंतु ऑनलाइन अर्ज सादर करताना केवळ एकच दस्तावेजाचा पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे केवळ संपत्तीच्या मालकी विषयीचा आहे. उर्वरित दस्तावेज अपलोड करण्याचा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन अर्ज सादर करणारा केवळ एकच दस्तावेज सादर करू शकतो. उर्वरित दस्तावेज नसल्याने संबंधिताचा अर्ज कार्यालयात अडकून पडतो. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर सबंंधित अर्जदार जेव्हा कार्यालयात विचारणा करायला जातो तेव्हा त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. कार्यालयाच्या अनेक चकरा मारल्यानंतर ग्राहकाकडून संबंधित दस्तावेज मागून काम केले जाते. त्यामुळे ऑनलाईन सेवा केवळ नावापुरतीच ठरत आहे.

बॉक्स

दस्तावेज आवश्यक आहेत

महावितरणच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते स्पष्ट काहीही बोलायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनीच्या धोरणानुसार सर्व काही होत आहे. मात्र बिलावरील नाव बदलण्यासाठी सर्व दस्तावेज आवश्यक आहेत. एका दस्तावेजाच्या आधारे नाव बदलणे शक्य नाही. नंतर कायदेशीर अडचणी निर्माण होतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Requested 5, option of only one document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.