शहरात विविध संघटनांतर्फे प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:32+5:302021-02-05T04:47:32+5:30
नागपूर : शहरातील विविध संघटनांतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहणासह गणराज्यदिन चिरायू होवो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ...

शहरात विविध संघटनांतर्फे प्रजासत्ताक दिन
नागपूर : शहरातील विविध संघटनांतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहणासह गणराज्यदिन चिरायू होवो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
ए. आर. फुले ज्युनियर कॉलेज ()
शांतीनगर येथील ए. आर. फुले ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला. सचिव रमेश फुले, अध्यक्ष अर्चना फुले, उपाध्यक्ष तुषार फुले, मोहित फुले, प्राचार्य मंगेश खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अर्चना चिखले, दिनेश मुरया, विभा पारधी, रसिका आदमने, प्रिया बोरकर, राहिला खान, तहिरा जैदी, नेहा डोलई उपस्थित होते. संचालन लक्ष्मी तिवारी यांनी केले, तर आभार सुमित रहाटे यांनी मानले.
बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन ()
रामदास पेठेतील मनपाच्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन शाळेत गणराज्यदिन साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका रूपा राय, मुख्याध्यापक अभ्यंकर उपस्थित होते. याप्रसंगी ‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’त प्रयोग सादर करणाऱ्या कांबळे, आडे व राऊत या तीन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संचालन आष्टनकर यांनी केले, तर आभार ज्योती कोहळे यांनी मानले.
‘स्वीकार : आशियाना’ ()
विशेष मुलांच्या पालकांची संघटना ‘स्वीकार : आशियाना’च्या वतीने शंकरपूर, चिंचभुवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा झाला. प्रमुख पाहुणे विक्रम वोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. नामदेव राऊत, सचिव माधव दामले, डाॅ. आर. जी. गोखले उपस्थित होते. चलपतिराव यांनी आभार मानले. यावेळी मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन विकास खळतकर, अपर्णा बनगीरवार यांनी केले. अविनाश गोखले, अथर्व दिवे, आदित्य दामले, अमित खळतकर यांनी यावेळी भाषणे दिली.
.......