प्रजासत्ताकदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:33+5:302021-02-05T04:43:33+5:30

काटोल : तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. क्रीडा संकुल प्रांगणात उपविभागीय अधिकारी श्रीकांत ...

Republic Day excitement | प्रजासत्ताकदिन उत्साहात

प्रजासत्ताकदिन उत्साहात

काटोल : तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. क्रीडा संकुल प्रांगणात उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पाेलीस, हाेमगार्ड, एनसीसी व स्काऊट-गाईड पथकाने पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी तहसीलदार अजय चरडे, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, नायब तहसीलदार नीलेश कदम आदींसह नागरिक उपस्थित हाेते. पाेलीस ठाणे येथे उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी ठाणेदार महादेव आचरेकर, सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे, पाेलीस उपनिरीक्षक संताेष निभाेरकर तसेच पाेलीस कर्मचारी उपस्थित हाेते.

तहसील कार्यालय येथे तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार नीलेश कदम, रामकृष्ण जंगले तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित हाेते. नगर परिषद येथे नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी न.प. उपाध्यक्ष सुभाष काेठे, मुख्याधिकारी अशाेक गराटे, गटनेते चरणसिंग ठाकूर, माजी उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, तानाजी वनवे, शिक्षण सभापती देविदास कठाणे, राजू चरडे, किशाेर गाढवे, कनिष्ठ अभियंता नितीन गाैरखेडे, राजेंद्र काळे व कर्मचारी उपस्थित हाेते. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती तारकेश्वर शेळके यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी उपसभापती सुनील खळतकर, संचालक अजय लाडसे, सचिव पराग दाते व कर्मचारी उपस्थित हाेते. पंचायत समिती येथे सभापती धम्मपाल खाेब्रागडे यांनी ध्वजाराेहण केले. कार्यक्रमाला उपसभापती अनुराधा खराडे, गटविकास अधिकारी विजय धापके, गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड तसेच पं.स. सदस्य व कर्मचारी उपस्थित हाेते.

....

सावरगाव

सावरगाव : परिसरातील मसाेरा येथील श्री गुरू महाराज आदिवासी विद्यालयात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सदस्य राजेंद्र उमप यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश अरसडे, सचिव सुरेखा उमप, सरपंच जयपाल शेंबेकर, माजी सरपंच विजय राऊत यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित हाेते.

जलालखेडा

जलालखेडा : अरविंद पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताकदिन माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य आशुताेष केदार पवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. कार्यक्रमाला मुरली रेवतकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित हाेते.

Web Title: Republic Day excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.