राणा प्रतापनगर नागरिक समितीतर्फे प्रजासत्ताकदिन साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:50+5:302021-02-05T04:44:50+5:30

नागपूर : राणा प्रतापनगर नागरिक समितीतर्फे राणा प्रतापनगर चौकात प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मनपाचे शिक्षण सभापती प्रा. ...

Republic Day Celebration by Rana Pratapnagar Citizens Committee () | राणा प्रतापनगर नागरिक समितीतर्फे प्रजासत्ताकदिन साजरा ()

राणा प्रतापनगर नागरिक समितीतर्फे प्रजासत्ताकदिन साजरा ()

नागपूर : राणा प्रतापनगर नागरिक समितीतर्फे राणा प्रतापनगर चौकात प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मनपाचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षण उपसभापती प्रमोद तभाने, माजी महापौर नंदा जिचकार, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे व माजी नगरसेवक गोपाळ बोहरे प्रामुख्याने उपस्थित होते. अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण होत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व वाढावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सहसचिव डॉ. संदीप पथे यांनी केले

समितीचे अध्यक्ष ग्यानबा शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अरुण जातेगावकर, संजय बारामासे, नरेंद्र कुलकर्णी, डॉ. सतीश शास्त्री, मीनाताई पथे, राम केळापुरे, पद्माकर कुलकर्णी, गहलोद हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Republic Day Celebration by Rana Pratapnagar Citizens Committee ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.