मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन
By सुमेध वाघमार | Updated: February 28, 2023 18:39 IST2023-02-28T18:38:51+5:302023-02-28T18:39:39+5:30
Nagpur News ऑटोरिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी शहरात अनेक ऑटोचालक मीटरने प्रवासी वाहतूक करीत नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अशा ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन
नागपूर : ऑटोरिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी शहरात अनेक ऑटोचालक मीटरने प्रवासी वाहतूक करीत नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अशा ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ‘ टोल फ्री ’ क्रमांक व ‘ ई-मेल आयडी ’ उपलब्ध करून दिला आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने तब्बल ८ वर्षानंतर ऑटोरिक्षा भाड्यामध्ये १६ जून २०२२ रोजी वाढ केली. या मागे पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, ऑटोरिक्षाचा विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर आदी कारणे देण्यात आली. भाडेवाढीच्या दृष्टीने ऑटोरिक्षांचे ‘ मीटर कॅलिब्रेशन ’ करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली. परंतु अद्यापही अनेक ऑटोरिक्षाचालकांनी मीटरचे कॅलिब्रेशनच केले नसल्याची माहिती आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्याचे पाहत प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी ऑटोरिक्षा तपासणी मोहीम हाती घेतली. दोषी ऑटोवर कारवाई झाली. आता कठोर कारवाईसाठी प्रवाशांकडून तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
- पोलिसांसह आरटीओची संयुक्त कारवाई
प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले, विना मीटर चालणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांवर पोलिस उपायुक्त वाहतूक विभाग, नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.
- येथे करा तक्रार
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर येथील टोल फ्री क्रमांक-१८००२३३३३८८ यावर किंवा, ‘ आरटीओ डॉट ३१-एमएच@जीओव्ही डॉट इन ’ वर किंवा ‘ डीवायआरटीओ डॉट ४९-एमएच@जीओव्ही डॉट इन ’ या संकेत स्थळावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
-हे आहेत ऑटोरिक्षाचे दर
प्रति किमीकरिता : १८ रुपये भाडे
१.५ किमीकरिता : २७ रुपये भाडे