शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे विख्यात न्युरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन

By सुमेध वाघमार | Updated: December 31, 2025 14:42 IST

Nagpur : मूळचे लाखनी (सलोटी) व सध्या रामदासपेठ येथील 'हॅपी हाईट्स' येथील रहिवासी असलेले डॉ. पाखमोडे बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

नागपूर: आपल्या कौशल्याने हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे आणि नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक आधारस्तंभ, न्युरॉन हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे (५५) यांचे बुधवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचीच नव्हे, तर समाजाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ. मनीषा, मुलगा डॉ. अद्वैत, मुलगी अनन्या आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळचे लाखनी (सलोटी) व सध्या रामदासपेठ येथील 'हॅपी हाईट्स' येथील रहिवासी असलेले डॉ. पाखमोडे बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने धंतोली येथील त्यांच्या 'न्युरॉन हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीर्चेे प्रयत्न केले, मात्र सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

एक समर्पित वैद्यकीय प्रवास

डॉ. पाखमोडे यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (जीएमसी) एमबीबीएस आणि एम.सी.एच. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या नामांकित केईएम  हॉस्पिटलमधून न्युरोसर्जरीचे उच्च शिक्षण घेतले. ‘जीएमसीएच’शी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच वर्षे सेवा दिल्यानंतर, मार्च २०१४ मध्ये त्यांनी प्रसीद्व न्युरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी यांच्या सोबते न्युरॉन हॉस्पिटलची स्थापना केली. अत्यंत शांत, संयमी स्वभाव आणि रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे ते रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून ओळखले जात. कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात त्यांचा हातखंडा होता.

वैद्यकीय विश्वातून हळहळ आणि श्रद्धांजली

डॉ. पाखमोडे यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. एक अभ्यासू, तज्ज्ञ आणि रुग्णांविषयी कळवळा असलेला संवेदनशील डॉक्टर आपण गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली संवेदना व्यक्त केली. यासह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Renowned Neurosurgeon Dr. Pakhmode Passes Away, Leaving Medical Fraternity Mourning

Web Summary : Dr. Chandrashekhar Pakhmode, a renowned neurosurgeon from Nagpur, passed away due to a heart attack at 55. Known for saving thousands, his death is a significant loss to the medical community. He founded Neuron Hospital and was known for his skill and patient sensitivity.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य